सुंदरा मालदिवमध्ये रमली;पांढऱ्याशुभ्र बिकिनीत हॉट कियारानं केलं घायाळ

सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनीच फोटोजना दिली दाद.
Kiara Advani
Kiara AdvaniGoogle

कियारा अडवाणी(Kiara Advani) हा सध्याचा बॉलीवूडमधला एक प्रॉमिसिंग चेहरा. ती खूप देखणी आहे असं म्हणता येणार नाही, पण तिच्या चेहऱ्यात निष्पापपणा,गोडवा आहे जो समोरच्याला तिच्याकडे आकर्षित व्हायला नक्कीच फायदेशीर ठरतो. शिवाय अभिनयातील सहजताही तिच्याकडे आहे जे आपण आजपर्यंतच्या तिनं केलेल्या सिनेमातनं पाहिली आहे. 'महेंद्रसिंग धोनी' सिनेमात ती सुशांतसिंग राजपूतसोबत झक्कास दिसली. त्याचवेळी तिच्याकडे पाहून वाटलं होतं की या अभिनेत्रीला पुढे चांगली कामं मिळतील. आणि झालंही तसंच. 'कबिर सिंग' नंतर तर तिचं नशीबच फळफळलं. तिनं चांगल्या अभिनेत्रींसोबत आणि अभिनेत्यांसोबत काम केलं. नुकताच तिचा सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'शेरशहा' हा सिनेमा येऊन गेला. सिनेमाला चांगलं यशही मिळालं. पण याच सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सिद्धार्थ आणि कियारामधली केमिस्ट्रीही रंगलेली पहायला मिळाली.

कोरोनामुळे सध्या शुटिंग बंद असल्यामुळे सध्या अनेक कलाकार व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. कियारा अडवाणीही गेलूीय निळ्याशार पाण्याचं आरसपानी सौंदर्य लाभलेल्या मालदीवला. तिनं मालदीवमधले एन्जॉय करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात पांढऱ्या शुभ्र बिकिनीतील कियारा भलतीच हॉट दिसतेय. तिच्या लूकवर चाहते घाय़ाळ झालेले पहायला मिळाले ते त्यांच्या कमेंट्स वाचून. कियारानं शेअर केलेल्या व्हिडीओत ती मालदिवच्या समुद्रात डुंबायचा आनंद घेताना दिसली तर कधी डॉल्फिनला पाहण्यात रमलेली दिसली. तिथल्या बीचवर पांढऱीशुभ्र बिकीनी घालून धावणारी कियारा पाहून एखाद्या सिनेमाचा शॉट शूट होतोय की काय असा भास झाल्याशिवाय राहणार नाही.

Kiara Advani
डॅशिंग अक्षयचा वाघासोबतचा थ्रीलिंग व्हिडीओ पाहिलात का?

इतकी सुंदर बाला एकटी कशी काय जाईल हा प्रश्न चाहत्यांना पडला अन् त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न केला,'सिद्धार्थ आणि तुझा तिथं काढलेला एखादा फोटो पोस्ट कर ना'. कुणी म्हणतंय,'सिद्दार्थच्या पायाचे ठसे पाहिलेत आम्ही,तेव्हा उगाच लपवू नका काही'...या आणि अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी कियाराच्या पोस्टवर केल्या आहेत. तिच्या फोटोवर शाहिद कपूरपासून सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत साऱ्यांनीच कमेंट्स केल्या आहेत. तिची तारीफ केली आहे. पण तरीही राहून राहून वाटतंय,सिद्धार्थचा १६ जानेवारीला वाढदिवस होता त्यानिमित्तानेच हे दोघे मालदीवला गेले असावेत. पण आता उगाच चाहत्यांना खरं काही ते सांगत नाही आहेत. नवीन वर्षाला वेलकम तर दोघांनी एकत्रच केलं होतं राजस्थानमध्ये जाऊन. मग हे का लपवत आहेत कोण जाणे? असो कियारा मात्र भलतीच हॉट दिसतेय हे ही नसे थोडके.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com