Kiran Mane झाले 'महाराष्ट्र आयकॉन', मुलगी झाली हो वादाचा पुन्हा उल्लेख, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran mane, mulgi zali ho

Kiran Mane झाले 'महाराष्ट्र आयकॉन', मुलगी झाली हो वादाचा पुन्हा उल्लेख, म्हणाले..

Kiran Mane News: बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी असलेले स्पर्धक आणि अभिनेते किरण माने बिग बॉस नंतर सुद्धा चर्चेत आहेत. किरण माने यांचा बिग बॉस नंतर ठिकठिकाणी सत्कार होत आहे.

नुकताच किरण माने यांना महाराष्ट्र आयकॉन हा मोठा पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत किरण माने यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

(Kiran Mane becomes 'Maharashtra Icon' )

किरण माने हे प्रत्येकवेळी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. महाराष्ट्र आयकॉन हा मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल किरण माने म्हणाले,

"खरं सांगतो दोस्तांनो, त्यावेळी मी अश्रूंशी संघर्ष केला नसता, तर आज या फोटोत माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याचं मोल मलाच कळलं नसतं !

काल मुंबईत मला 'महाराष्ट्र आयकाॅन ॲवाॅर्ड - २०२३' देऊन सन्मानित करण्यात आलं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मी स्विकारला.

'ऑलवेज हेल्पिंग हॅंड फाऊंडेशन' या समाजसेवी संस्थेनं रविंद्र नाट्यमंदिरात हा सोहळा आयोजित केला होता.

...हल्ली अशावेळी मन खूप हळवं होतं. गेल्या वर्षभरात मी वेदनेच्या खोल दरीतून समाधानाच्या शिखरापर्यन्तचा जो प्रवास केलाय तो आयुष्यभर विसरणार नाही.

१३ जानेवारी २०२२ ते ८ जानेवारी २०२३ - 'मुलगी झाली हो'ची नकोशी काॅन्ट्रोव्हर्सी ते 'बिगबाॅस'चे हवेहवेसे नादखुळा शंभर दिवस - या काळानं, कायम काळजात जपून ठेवाव्या अशा विलक्षण, अद्भूत आठवणी दिल्या !

संधीची खूप दारं उघडलीत... आता फक्त काम करायचंय... मनापास्नं, जीव लावून, भरपूर काम करायचंय... अभिनयातनं माझ्या चाहत्यांना आनंद द्यायचाय... बास ! आता कुठलाही त्रास नको."तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ।।

'हेल्पींग हॅन्ड'च्या सारीका घार्गे-कदम आणि सहकार्‍यांचे लै लै लै मनापास्नं आभार. अशा शब्दात किरण माने यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात.

किरण माने यांनी बिग बॉस मराठी ४ च्या फायनलमध्ये मजल मारली होती. ते बिग बॉस मराठी ४ चे टॉप ३ स्पर्धक होते.

टॅग्स :Marathi Movies