
Kiran Mane: सो काॅल्ड 'उच्च' माणसं इतरांना 'नी'च समजून.. किरण माने यांची पोस्ट वाचून तुम्ही दुखावू शकता..
kiran mane: अभिनेता किरण माने (kiran mane) हे आता केवळ मराठीच नाही तर अवघ्या मनोरंजन विश्वला ठाऊक असलेले अभिनेते आहेत. सतत नव्या विषयावर अत्यंत धिटाईने ते लिहीत असतात.
कधी सरकारला धारेवर धरणारी विधाने करत असतात. कधी कला क्षेत्रातील बड्या मंडळींसोबत फोटो शेअर करून ते आपल्या आठवणी सांगतात तर कधी नुतक्याच घडून गेलेल्या घटनेवर भाष्य करतात.
आज त्यांनी समजातील विषमतेवर सडेतोड भाष्य केले आहे. नेमकी लोकशाही म्हणजे काय? असा संतप्त सवाल त्यांनी प्रत्येकाला विचारला आहे.
(kiran mane shared post about cast religion discrimination democracy )
या पोस्ट मध्ये किरण माने यांनी लिहिले आहे की, ''मला माझ्या भवताली जातीभेदाने, धर्मद्वेषाने बरबटलेला समाज हवा आहे का???''
''ताकदवान लोक दीनदुबळ्यांना तुडवतायत... सो काॅल्ड 'उच्च' माणसं इतरांना नीच समजून बडवतायत... भर रस्त्यात तलवारींनी वार करून फाडून टाकतायत... पुरूषी वर्चस्वाचा माज हतबल महिलांची फरपट करतोय...''
''क्रूर, रानटी जनावरांगत विष ओकत फिरणार्यांना कुणाचीच भिती नाही.
मनात करूणा, दयाभाव आणि हातात मानवतेचा दिवा असणार्यांना सुरक्षितता नाही.''
''माझ्या मनातला 'आदर्श समाज' असा आहे का? मला भवताली स्वातंत्र्य, समता, बंधुता हवी असेल, तर कुणाला राग येण्यासारखं त्यात काय आहे?? कुणाचं वाईट होणार आहे यातून?
आपसात 'बंधुत्व' असावं अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय आहे???''
पुढे किरण माने म्हणतात, ''लोकशाही' म्हणजे फक्त शासन पद्धती नाही माझ्या भावाबहिणींनो... ती 'सहजीवन' पद्धती आहे ! आपण कुठल्याही जातीधर्माचे असू... एकमेकांसाठी आदर आणि श्रद्धा असली तर काय बिघडणार आहे आपलं?''
''आपल्या सगळ्यांना आपल्या या महान भारतदेशात मोकळेपणानं वावरण्याचा अधिकार, आपल्या जीवीत आणि सुरक्षेचा अधिकार हवा की नको?''
''मी कुणी सर्वज्ञ नाही. मी ही यावर विचार करतोय... आपण सगळेच जमल्यास चिंतन करूया... आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपला देश, आपला भवताल पूर्वीपेक्षा अधिक सुंदर, अधिक सुरक्षित, हवाहवासा असावा हे तर सगळ्यांचा वाटत असेल. त्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्याला आपल्या स्वत:पुरतं काय करता येईल ते करूया. जय शिवराय, जय भीम !'' अशा शब्दात किरण माने यांनी परखडपणे भाष्य केले आहे.