Shiv Jayanti 2023: शिवरायांच्या कार्याचा अभिमान बाळगायचा असेल तर.. किरण मानेंची पोस्ट व्हायरल

किरण माने यांनी शिवाजी महाराजांना वंदन केले होते
shiv jayanti 2023, kiran mane, shivaji maharaj
shiv jayanti 2023, kiran mane, shivaji maharajSAKAL

Kiran Mane Viral Post On Shivaji Maharaj: आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवाजी महाराजांनी दिलेली मूल्य, शिकवण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आत्मसात केली पाहिजेत.

अनेक मराठी कलाकार शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि प्रेम दर्शवत असतात. अशातच बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ मध्ये पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल उत्कट पोस्ट लिहिली आहे.

shiv jayanti 2023, kiran mane, shivaji maharaj
Sayli Patil: परश्याची नवीन हिरोईन दिसायला अतिसुंदर सायली..

किरण माने यांची बिग बॉस मधून बाहेर आल्यावर साताऱ्यात मिरवणूक निघाली होती. त्यावेळी किरण माने यांनी शिवाजी महाराजांना वंदन केले होते. तो फोटो पोस्ट करून किरण माने यांनी एक महत्वाची पोस्ट लिहिली आहे.

माने लिहितात.. .शिवराय कशाच्या सहाय्यानं लढले? शारीरिक बळाच्या? तलवारीच्या? की कुणा सहकार्‍याच्या सल्ल्याच्या? नाय नाय नाय माझ्या दोस्तांनो... शिवरायांची ताकद एकच होती... त्यांची 'अनल्प' बुद्धी !

'अनल्प' म्हणजे अफाट, अमर्याद. इंग्लीशमध्ये सांगायचं तर इन्फिनाईट इन्टेलिजन्स. शिवरायांच्या विलक्षण बुद्धीमत्तेचं वर्णन करताना परमानंदानं हा शब्द वापरलाय.

परमानंद... एक अत्यंत प्रतिभावान शिवकालीन कवी ! होय, तोच तो ज्यानं शिवरायांच्या हयातीत, शिवरायांच्या परवानगीनं त्यांचं चरीत्र लिहीलं !!

shiv jayanti 2023, kiran mane, shivaji maharaj
Yogita Chavan: पब्लिक तुझा दिवाना, तू हृदयाची राणी अंतरा

परमानंदाबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा वाचलं डाॅ. आ.ह. साळुंखेंच्या 'शिवराय : संस्कार आणि शिक्षण' या पुस्तकात.

"शिवरायांसाठी परमानंदाने वापरलेला 'अनल्पधी:' हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करुन गेला आहे आणि मस्तकामध्ये कोरला गेला आहे." असं आ.ह. तात्या म्हणातात. यावरूनच याचं मोल काय असेल ते आपण ओळखू शकतो.

शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला, आग्र्याहून कशी शिताफीनं सुटका करून घेतली, शाहिस्तेखानावर कसा छुपा हल्ला केला. या सुरस कथा आपण कायम ऐकतो...

पण हे सगळं त्यांनी फक्त ताकदीवर, किंवा शस्त्रास्त्रांच्या मदतीनं केलं नाही... प्रत्येक लढाई शिवराय 'बुद्धीनं' लढले. शक्तीचा आणि शस्त्रांचा वापर करण्याआधी, त्यांच्या प्रत्येक चालीवर बुद्धीचा लगाम होता. खर्‍या अर्थानं 'मास्टरमाईंड' !

माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्या कर्तबगारीचा उगम मेंदूतूनच होतो. आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असूद्यात...तिथे आपण जे काही 'ॲचिव्ह' करतो, कमावतो, पराक्रम गाजवतो, त्या सगळ्याचं मूळ असते 'बुद्धी'.

आपलं बोलणं, आपल्या हालचाली, आपली ताकद, आपण व्यक्त होण्यासाठी जे जे काही वापरतो... मन असो वा मनगट, पेन असो वा पिस्तूल... कशालाही ताकद देण्याचं, योग्य दिशा दाखवण्याचं, भान आणि नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असेल तर 'बुद्धी' !

...आपल्याला जर शिवरायांच्या महान कार्याचा अभिमान बाळगायचाय, तर त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबरच या 'अनल्प बुद्धी'चा वारसा घेणं आजच्या काळात लै लै लै गरजेचं आहे.

विवेकाच्या शत्रूचा सामना करताना, जर बुद्धीनं लढायचं तंत्र आपण शिकलो, तर सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई अवघड नाही !!! जय शिवराय.

अशी पोस्ट करत किरण माने यांनी शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त केलाय. किरण माने लवकरच महेश मांजरेकरांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com