भाईजानला चाहत्यांनी ईदी दिली की नाय? काय सांगतात Kisi Ka Bhai Kisi Ki Jaanच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie esakal

सलमान खानचा या वर्षातील बहूप्रतिक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' हा 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही ईदच्या एक दिवस आधी रिलीज झाला. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटांची खुपच प्रतिक्षा लागलेली होती. मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर याविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie
Arun Govil at Ayodhya: 'रामायण' फेम अरुण अयोध्येत पोहोचताच चाहत्यांचा आनंद गगनात... केलं असं काही की...

भाईजानच्या 'किसी का भाई किसी की जान'ला ओपनिंगच्या दिवशी चांगली ओपनिंग मिळाली आहे. त्यानंतर निर्मात्यांना दुसऱ्या दिवशीही या चित्रपटांकडून चांगल्या कमाईची अपेक्षा होती. अशा परिस्थितीत 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करू शकला हे सांगणारे आकडे समोर आले आहेत.

पहिल्या दिवशी म्हणजे आठवड्याचा दिवस असला तरी, किसी की भाई किसी जानने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केली नाही. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटानं जरा चांगली कमाई केली आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie
Manoj Bajpayee Birthday: 'त्या' घटनेनंतर आत्महत्या करणार होते मनोज वाजपेयी; पण..

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 15.81 कोटींच्या जवळपास कमाई केली होती असं आकडेवारीतुन समोर आलं मात्र आता 'किसी का भाई किसी की जान'च्या दुसऱ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाजही दिला आहे.

ईदच्या सुट्टीमुळे 'किसी का भाई किसी की जान'च्या कमाईत रिलीजच्या दिवशी 50-60 टक्क्यांनी वाढ होऊ शकते असा अंदाज असतांना 'किसी का भाई किसी की जान' दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 22-25 कोटींचा व्यवसाय करू शकतो.

तर Koi Moi.com वर विश्वास ठेवला तर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 24-26 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दोन दिवसांची कमाई एकत्र करून चित्रपटाने 39 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

त्याचवेळी, वीकेंडलाच हा चित्रपट 50 कोटींची कमाई पार करेल अशी अपेक्षा आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप आशा आहेत.

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप आशा आहेत. गेली चार वर्षे सलमान खानच्या फिल्मी करिअरसाठी खास राहिलेली नाहीत.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie
Manoj Bajpayee Birthday: 'सत्या' सुपरहिट झाला अन् मनोज वाजपेयीला अशी मिळाली लाईफ पार्टनर

पूजा हेगडे ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. याशिवाय चित्रपटात व्यंकटेश, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, भूमिका चावला यांसारखे स्टार्सही आहेत. या चित्रपटात राघव सलमानच्या भावाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com