Kiss Day Special : इंटिमेट सीनच्या वेळी जॉनचा बिपाशाला एकच प्रश्न! पुजानं लावला डोक्याला हात

बिपाशा या चित्रपटामध्ये लीड रोलमध्ये होती. जिस्ममधून बोल्ड सीनच्या माध्यमातून बिपाशा व्हायरल होती. तिची आणि जॉनच्या रिलेशनची देखील चर्चा व्हायरल झाली होती.
 Kiss Day Special
Kiss Day Special esakal

Kiss Day Special : बॉलीवूडमध्ये काही सेलिब्रेटींचे अफेयर्स हे नेहमीच चर्चेचा विषय असतो. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे रंजक किस्से व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री बिपाशा बसू यांच्या जिस्म चित्रपटाच्या वेळचा तो प्रसंग सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

जॉन आणि बिपाशाची वेगळ्या प्रकारे ओळख करुन देण्याची गरज नाही. त्यांचा प्रभाव, त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. भलेही बिपाशानं मोठ्या कालावधीनंतर जॉनसोबतचं रिलेशन ब्रेक केले. त्याचीही बराचकाळ चर्चा सुरु होती. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या जॉननं एका मुलाखती दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेल्या जॉनच्या अभिनयाची, त्याच्या हटके स्टाईलची गोष्टच वेगळी आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

२००३ मध्ये जॉन आणि बिपाशा बसूचा जिस्म प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटातून त्यानं डेब्युही केलं होतं. बिपाशा या चित्रपटामध्ये लीड रोलमध्ये होती. जिस्ममधून बोल्ड सीनच्या माध्यमातून बिपाशा व्हायरल होती. तिची आणि जॉनच्या रिलेशनची देखील चर्चा व्हायरल झाली होती. भट्ट कँपच्यावतीनं निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्माती पुजा भट्ट होती.

कलाकारांना भूमिका करताना कोणत्याही प्रकारचा तणाव जाणवणार नाही. याची काळजी पुजा सेटवर घेत असे. जेव्हा जॉन आणि बिपाशाच्या इंटिमेट सीनची वेळ आली तेव्हा मात्र तिचा गोंधळ उडाला होता. तो सीन शुट करण्यापूर्वी पुजानं बिपाशाला ती तयार आहे का असा प्रश्न विचारला होता. जॉनलाही तिनं तोच प्रश्न विचारला होता. मात्र त्यावर त्यानं जे उत्तर दिलं त्यामुळे पुजालाही धक्काच बसला होता.

 Kiss Day Special
Bigg Boss ट्रॉफी जिंकणाऱ्या MC Stanचं खरं नाव काय? त्याला MC हे नाव कसं पडलं?

बिपाशा तू रेडी झाली आहेस का त्या सीनसाठी असं पुजानं तिला विचारले होते. हाच प्रश्न जॉनला विचारल्यानंतर त्यानं तुला माझी काळजी आहे की नाही, मी तिच्यासोबत तो सीन करण्यासाठी तयार आहे की नाही माझी मानसिक तयारी आहे किंवा नाही हे तू मला का विचारले नाहीस, असा प्रश्न जॉननं पुजाला विचारला होता. त्यावेळी तिला काय बोलावं हेच कळेनासे झाले होते. जॉननं तोच प्रश्न बिपाशालाही विचारला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com