मंदिरा बेदीच्या आयुष्यात नवा मित्र? पूल मधल्या हॉट फोटोची रंगली चर्चा Mandira Bedi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mandira Bedi Targeted For Posting Pool Pictures With Friend,

मंदिरा बेदीच्या आयुष्यात नवा मित्र? पूल मधल्या हॉट फोटोची रंगली चर्चा

अभिनेत्री मंदिरा बेदीचा(Mandira Bedi) नवरा दिग्दर्शक राज कौशल याचं गेल्याच वर्षी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं अचानक निधन झालं होतं. मंदीरा बेदी जितकी खंबीर दिसली होती त्यावेळी, तितकीच ती मनातनं कोसळलीही होती. अनेकदा आपले बोल्ड फोटो शेअर करणारी मंदिरा त्यावेळी सोशल मीडियावरनं जणू गायब झाली होती. आता जवळ-जवळ वर्षभरानंतर मंदिरानं बिकिनी घालून फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा: Jhund: 6 मे रोजी 'झुंड' OTT वर नाहीच? सुप्रीम कोर्टात ठरणार भवितव्य

मंदिरा सध्या थायलंडमधील फुकेत आयलंड वर आपल्या खास मित्राचा बर्थ डे सेलिब्रेट करीत आहे. तिनं आपला तो खास मित्र आदित्य मोटवानी सोबतचा पूल साईडला काढलेला सेल्फी शेअर करीत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मित्राला घट्ट मिठी मारत काढलेला तो फोटो शेअर करीत मंदिरानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''हॅप्पी बर्थडे आदि. हा फोटो खूप काही बोलून जातोय,तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस,आपण दोघे एकमेकांना किती वर्षांपासून ओळखत आहोत, आपल्यात किती छान बॉन्डिंग आहे आणि मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते या सर्व गोष्टींविषयी. तुला खूप प्रेम,आनंद आणि यश मिळो पुढील आयुष्यात. लव्ह यू,वयाच्या १७ व्या वर्षापासून माझ्यासोबत असलेल्या माझ्या खास मित्रा''.

Mandira Bedi's Instagram post- comment's image

Mandira Bedi's Instagram post- comment's image

मंदिरा बेदीनं हे फोटो(Photo) शेअर करत काही तासच होत असताना आता नेटकऱ्यांनी तिला यावरुन ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'मजा आहे तुमची'. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे,'हा कोण आहे,नवरा तर राहिला नाही तुझा,निधन झालं त्याचं'. ट्रोल्सला पाहिल्यानंतर दिसून आलं आहे की मंदिरानं कमेंट सेक्शनच बंद करून टाकलंय. पण तिच्या या फोटोंना तिच्या इतर अनेक चाहत्यांनी मात्र पसंत केलं आहे.

Web Title: Mandira Bedi Targeted For Posting Pool Pictures With Friend Trolls Lambast With Nasty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top