आलिया-रणबीरच्या लग्नाआधीच ठरलं घटस्फोटाचं वर्ष, कुणी केली भविष्यवाणी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Ranbir Kapoor is dating Alia Bhatt

आलिया-रणबीरच्या लग्नाआधीच ठरलं घटस्फोटाचं वर्ष, कुणी केली भविष्यवाणी?

मुंबई - बॉलीवूडचं हॉट कपल्स म्हणून आलिया भट (alia bhatt) आणि रणवीर कपूर (ranbir kapoor) यांची ओळख आहे. ते सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. सध्या त्यांच्या लग्नाच्या तारखेचा विषय जोरदार व्हायरल झाला आहे. त्यावर अभिनेता आणि युट्युबवर कमाल खाननं (kamal khan) एक प्रतिक्रिया दिली आहे.. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाला आहे. त्यानं त्यांच्या लग्न आणि घटस्फोटाबाबत एक भविष्यवाणी केली आहे. ट्रोलर्सनं त्याला त्यावरुन ट्रोलही केले आहे. मात्र त्याचा कुठलाही परिणाम त्याच्यावर झालेला नाही.(krk predction alia bhatt and ranbir kapoor married next year and take divorce)

स्वताला चित्रपट समीक्षक समजणारा कमाल राशिद खान (krk)अर्थात केआरकेनं एक भविष्यवाणी केली आहे. त्यात त्यानं आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत पोस्ट केली आहे. तो एवढ्यावरच थांबलेला नाही. त्यानं त्यांच्या घटस्फोटाची तारीखही जाहीर केली आहे. यासगळ्यात रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांनी कमाल खानवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल खाननं आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: 'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा

हेही वाचा: Mimi trailer: 'सरोगेट मदर'ची अनपेक्षित कहाणी

कमालनं त्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, 2022 पर्यत रणबीर आणि आलियाचं लग्न होण्याची शक्यता आहे. मात्र पंधरा वर्षांच्या आत त्यांचा काडीमोड झाल्याशिवाय राहणार नाही. असं भाकित त्यानं वर्तवलं आहे. पंधरा वर्षांपर्यत त्यांचा संसार चालेल. 2037 पर्यत ते एकमेकांपासून वेगळे झालेले असतील. कमाल खानचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Web Title: Krk Predction Alia Bhatt And Ranbir Kapoor Married Next Year And Take Divorce

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bollywood News