esakal | Drishyam 2 चा हिंदीत सिक्वेल, अजयची तयारी सुरु

बोलून बातमी शोधा

  ajay devgn drishyam 2
Drishyam 2 चा हिंदीत सिक्वेल, अजयची तयारी सुरु
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - साऊथच्या चित्रपटांची कॉपी करणं बॉलीवूडला नवीन नाही. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांची कॉपी केली आहे. त्या चित्रपटांना बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानं आता सर्रास सिक्वेलच्या नावाखाली नव्यानं चित्रपट तयार करण्यावर भर दिला जातो. अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांचे अनेक चित्रपट साऊथच्या मुव्हीवर आधारित आहे. 2015 मध्ये अजय देवगणचा दृश्यम चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोन महिन्यांपूर्वी साऊथमध्ये मल्याळम दृश्यमचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. त्यावरुन आता त्याचा सिक्वेल हिंदीत येतो आहे.

2013 मध्ये पहिल्यांदा दृश्यमचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. अजय देवगण निर्माता कुमार मंगत याच्यासोबत दृश्यम २ तयार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजयनं दृश्यमच्या दुस-या भागाचे हक्क खरेदी केले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माता कुमार मंगत हिंदीत दृश्यमचा दुसरा भाग तयार करणार आहेत. मल्याळममध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जीतु जोसेफ यांनी केले होते. त्यात प्रसिध्द अभिनेता मोहनलाल याने काम केले आहे. तर हिंदीत प्रसिध्द दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी दिग्दर्शन केले होते. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले.

हेही वाचा: कोरोना रूग्णांसाठी 'देसी गर्ल'ने जमवला पाच कोटींचा निधी

हेही वाचा: कंगनाला टिव-टिव भोवली; ट्विटर अकाऊंट केलं सस्पेंड

अजयनं सध्या डिझ्नी हॉटस्टार बरोबर रुद्र नावाच्या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. असे सांगण्यात आले आहे की, रुद्र पूर्ण झाल्यानंतर तो दृश्यमच्या दुस-या भागाची तयारी करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी तयार होणार आहे. आता त्याचे शेड्युल्ड तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार ते नाव निर्माते थोड्याच दिवसांत सांगणार आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी मल्याळम भाषेत दृश्यमचा २ भाग प्रदर्शित झाला तेव्हाच जोसेफ य़ांनी तेलुगूमध्येही त्याच्या रिमेकचे काम सुरु केले होते. त्यात मुख्य अभिनेता म्हणून वेंकटेश यांना साईन करण्यात आले आहे.

सध्या अजय त्याच्या ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय त्याचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित तयार होणार आहेत. ते म्हणजे मैदान आणि मे डे. संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी मध्येही त्याचा खास रोल आहे.