वाह, क्या बात है! परदेशातलं उच्च शिक्षण सोडून आली अन् बनली सर्वात तरुण महिला सरपंच Gram Panchayat Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashodhara Mahendrasingh Shinde

वड्डी गावातील तरुणी मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी जॉर्जिया या देशात गेली होती.

Gram Panchayat Election : वाह, क्या बात है! परदेशातलं उच्च शिक्षण सोडून आली अन् बनली सर्वात तरुण महिला सरपंच

Sangli Gram Panchayat Election : आपल्या देशात तरुणांकडून राजकारणाकडं तुच्छतेनं पाहिलं जातं. तरुण पिढी राजकारणाबाबत उदासीन असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सांगलीतील एक तरुणी याला अपवाद ठरलीये. जॉर्जिया इथं वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न असणारी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे (Yashodhara Mahendrasingh Shinde) ही सांगली जिल्ह्यातील 'वड्डी' ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी निवडून आलीये.

हेही वाचा: Gram Panchayat Result : शेवटी शिंदे गटाच्या खासदारानं मुलाच्या पराभवाचा वचपा काढलाच; ठाकरे गटाला चारली धूळ!

यशोधरा ठरली सर्वात तरुण महिला सरपंच

या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलचा (Vaddi Gram Panchayat Election) एकतर्फी विजय झाला असून सर्व जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. वड्डी गावातील तरुणी यशोधरा शिंदे मेडिकलचं शिक्षण (Medical Education) घेण्यासाठी जॉर्जिया (Georgia) या देशात गेली होती. मेडिकल शिक्षण घेतलेली यशोधरा महेंद्रसिंह शिंदे ही सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आलीये. यशोधरा शिंदे या सर्वात तरुण महिला सरपंच देखील ठरल्या आहेत.

हेही वाचा: Gram Panchayat Result : एकमेकींविरोधात दोघींचा जोरदार प्रचार; अखेरच्या क्षणी सूनच ठरली सासूवर भारी

परदेशातील धर्तीवर गावच्या विकासाचं व्हिजन

वड्डी हे मिरज तालुक्यातील (Miraj Taluka) कर्नाटकच्या सीमेवर असलेलं जवळपास पाच हजार लोकसंख्येचं छोटेसं गाव आहे. गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाहीये, तसंच महिला आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत यशोधरा निवडणुकीच्या रिंगणार उतरली होती. शुद्ध पिण्याचं पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचत का नाहीत? या मुद्यांवर शिंदेंनी घराघरात जाऊन प्रचार केला होता. यशोधरानं परदेशातील धर्तीवर गावाचा विकास करण्याचं व्हिजन गावकऱ्यांसमोर ठेवत मतं मागितली होती आणि यात तिला चांगलंच यश प्राप्त झालं.