Kushal Badrike: 'बायकोची ती गोष्ट आठवली की कुशल बद्रिकेला येतो राग!' |Kushal Badrike share wife sunayana video viral social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kushal Badrike news

Kushal Badrike: 'बायकोची ती गोष्ट आठवली की कुशल बद्रिकेला येतो राग!'

Kushal Badrike : चला हवा येऊ द्या मधून घराघरात पोहचलेला कुशल बद्रिके हा आता मोठा स्टार झाला आहे. त्याचं सेलिब्रेटीपण चाहत्यांना नेहमीच आवडतं. (tv entertainment news) त्याच्याशी संबंधित कोणती नवीन माहिती असल्यास ती जाणून घ्यायला ते उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. कुशल हा सोशल (social media post) मीडियावर अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी आहे. त्यानं यापूर्वी शेयर केलेल्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्याचं झालं असं की, कुशलला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. त्यावरुन (marathi celebrities) त्याने लिहिलेल्या एका पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कुशलची विनोदी शैली, त्याच्या भूमिका या नेहमीच चाहत्यांना निखळ आनंद देत असतात.

चला हवा येऊ द्या या मालिकेशिवाय स्ट्रगलर साला वेबसीरिजमध्ये कुशल हा चमकला होता. त्याच्या भूमिकेवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला होता. काही महिन्यांपूर्वी तो वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यासगळ्यात कुशल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या चर्चेत असणं नित्याचे झाले आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या कुशल सोबत त्याची पत्नी सुनयना देखील होती. त्यानं त्या कोंडीचा सामना करताना झालेल्या मनस्तापाचा व्हिडिओ शेयर केला असून त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात कुशलनं पत्नीविषयी खास गोष्ट सांगितली आहे.

त्या प्रचंड अशा वाहतूक कोंडीमध्ये गाडी चालवणे किती जिकिरीचे असते हे कुशलनं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. एकीकडे ट्रॅफिक जॅम आहे. त्यात सुनयना ही प्यार किया तो डरना क्या हे गाणं ऐकत आहे. ती त्या गाण्यात एवढी रंगून गेली आहे की तिनं त्या गाण्यावर गाडीतच हातवारे करुन डान्स करण्यास सुरुवात केली आहे. यावर कुशलनं थोडसं चिडून प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रवास म्हटलं की ट्रॅफिक लागणारच, त्यात वेळ जात नाही म्हणून असं कोण वागतं यार. तुमचा वेळ जातो ओ… इथे आमचा जीव…. जाऊ दे चल आता तो विषय नको.' त्याच्या या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी देखील त्याला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी देखील कुशलच्या वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांचा प्रतिसादही मोठा आहे. इंस्टावर कुशलला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटीमध्ये कुशलचं नाव आता घेतलं जातं आहे.