Kushal Badrike : "Investment चुकली की माणसाचा बाजार उठतो", कुश्या असं काय झाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kushal Badrike

Kushal Badrike : "Investment चुकली की माणसाचा बाजार उठतो", कुश्या असं काय झाल?

चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) या कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष आपला दबदबा छोट्या पडद्ययावर कायम ठेवला आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग हा केवळ मराठी भाषिक प्रेक्षक नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकही आहे.

जगातील कानाकोपऱ्यात हा शो मोठ्या आवडीनं पाहिला जातो. या शोचा हिरो कुशल बद्रिके (Kushal Badrike) अनेकवेळा आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळवून हसवतो.

चहा हवा येऊ द्या मधून कुशलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कॉमेडीचा बादशाह कुशल बद्रिके याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. पांडू चित्रपटात तर त्याने फाडू अभिनय केला. आपल्या हजरजबाबी स्वभामुळे तो चर्चेत असतो. आपल्या पंचने तो प्रेक्षकांना खेळवून ठेवतो.

कुशल बद्रिके सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. अनेक फोटो तो शेअर करत असतो. तो नुसते फोटो शेअर करत नाही तर त्या फोटोला दिलेले कॅप्शन देखील जबरी असते. असाच एक फोटो शेअर करत कुशल बद्रिकेने चाहत्यांना सल्ला दिला आहे.

हेही वाचा: Pathaan Movie Release: भोपाळमध्ये 'पठाण'वरून राडा! सिनेमागृहाबाहेर हनुमान चालिसा वाचून कार्यकर्त्यांचा निषेध

"Investment चुकली की लॉस होतोच, कधीकधी तर आपला मुद्देलमाल सुद्धा परत मिळत नाही. सगळं बाजारावर डिपेंड करतं. Emotional investments ना सुद्धा हाच नियम लागू पडतो. फरक एवढाच आहे की इथे investment चुकली की माणसाचाच बाजार उठतो.(अपनेआपको पूरी सावधानी से invest करे! )", असा सल्ला कुशलने दिला आहे. त्याच्या प्रेक्षकांना हा सल्ला खूप आवडला आहे. लोक त्याच्या फोटोवर कमेंट्स करत आहेत.

भावनिक गुंतवणूक मधे नुकसान झालं तर जरा त्रास होता.... तुम्ही छान व्यक्त करता, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. अभिनेत्री मानसी नाईकने सुद्धा या पोस्टवर कमेंट केली आहे. कुशलच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. 

हेही वाचा: Abdu Rozik : अब्दु रोजिकचं नशीब चमकलं ! भेटली आणखी एक रिअ‍ॅलिटी शोची ऑफर