Lalit Susmita Love Story: 'काळंधन परत आणलं धन्यवाद!' KRK ची तिखट प्रतिक्रिया

फिल्म इंडस्ट्रीतील कमाल राशिद खान अर्थात केआरके हा त्याच्या वादग्रस्त प्रतिक्रियेमुळे चर्चेत असतो.
Lalit Susmita Love Story:
Lalit Susmita Love Story:esakal

Lalit Modi Sushmita Love Story: फिल्म इंडस्ट्रीतील कमाल राशिद खान अर्थात केआरके हा त्याच्या वादग्रस्त प्रतिक्रियेमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रेटीवर प्रतिक्रिया देणे, त्याला डिवचणे, त्यांच्या चित्रपटांवर (Social media viral news) टीकात्मक रिव्ह्यु करणे हे केआरकेचं नेहमीचे काम आहे. आता तो ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यावर बोलल्यामुळे चर्चेत आला आहे. (bollywood Actress) कालपासून ललित मोदी - सुष्मिता सेनच्या लवस्टोरीचे किस्से व्हायरल झाले आहे. ते लग्न बंधनात अडकले अशी अफवा पसरली होती. त्यावर मोदी यांनी आम्ही लग्न केलं नसून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले आहे.

यासगळ्या पार्श्वभूमीवर केआरकेचं ट्विट व्हायरल झाले आहे. राजकीय, (Bollywood Actor Krk) सामाजिक कोणताही विषय असो आपण त्यावर प्रतिक्रिया द्यायचीच असा केआरकेचा अट्टाहास असतो. त्या अट्टाहासापोटी तो वादाच्या भोवऱ्यातही सापडतो. मात्र त्याची त्याला काही फिकीर नसते. काही महिन्यांपूर्वी त्यानं बॉलीवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतला होता. त्याच्या राधे नावाच्या चित्रपटाचा केआरकेनं केलेला रिव्ह्यु हा वादात आला होता. सलमाननं तर त्याला आपली बदनामी केल्याप्रकरणी कोर्टातही खेचलं होतं.

आता केआरकेनं ललित मोदी आणि सुष्मितावर दिलेली प्रतिक्रिया ही नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यानं सोशल मीडियावर ट्विट करुन लिहिलं आहे की, मी सुष्मिता मॅडमला भारतात पुन्हा काळधनं घेऊन आल्याबद्दल धन्यवाद देतो. ललित मोदी यांनी काही वर्षांपूर्वी हे धन भारतातून घेऊन पलायन केलं होतं. मॅडम तुम्ही खऱ्या देशभक्त आहात. विजय माल्या, नीरव मोदी जे लंडनमध्ये आहेत त्यांच्याकडून देखील तुम्ही अशाचप्रकारे पैसे परत आणल्यास बरे होईल. अशा शब्दांत केआरकेनं सुष्मिता आणि नीरव मोदीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Lalit Susmita Love Story:
Video: ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

केआरकेच्या त्या व्टिटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, तुला मोदीचं नाव घेताच एवढा राग का आला आहे, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तुम्ही एक गोष्ट अजुन लक्षात घेतलेली नाही. ती म्हणजे सुष्मितानं मोदींसोबत एकही फोटो शेयर केलेला नाही.

Lalit Susmita Love Story:
Viral Video: गाडीचा हॉर्न वाजला, नागोबा डुलायला लागले! एक मोरही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com