बर्थडे स्पेशल: लता मंगेशकर यांचं बालपण होतं संघर्षमय, 'या' कारणासाठी केलं नाही लग्न

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 28 September 2020

दिनानाथ मंगेशकर यांचे मित्र मास्टर विनायक त्यांना गायन आणि अभिनय क्षेत्रात घेऊन आले. १९४२ मध्ये  लता दीदी यांनी मराठी सिनेमात काम केलं.

मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लतादीदी यांनी आज ९२ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. लता यांचं आयुष्य आत्ता जरी सुखसोयींनी युक्त असलं तरी त्यांचं लहानपणमात्र खूपंच संघर्षाने भरलेलं होतं. लता दीदी १३ वर्षांच्या असताना त्यांचे वडिल मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दिनानाथ मंगेशकर यांचे मित्र मास्टर विनायक त्यांना गायन आणि अभिनय क्षेत्रात घेऊन आले. १९४२ मध्ये  लता दीदी यांनी मराठी सिनेमात काम केलं. जवळपास सात दशकांपेक्षा जास्त काळ लता दीदी त्यांच्या आवाजाने रसिकांचं मनोरंजन करत आहेत. 

हे ही वाचा:  'इतनी शक्ती हमे देना दाता'चे गीतकार अभिलाष यांचं निधन  

लता दीदी यांच्यावर वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी आली. एका मुलाखतीत लता मंगेशकर यांनी सांगितलं होतं की 'घरातील सगळ्या सदस्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातंच जर लग्नाचे विचार आले तरी ते मी अमलात आणू शकले नसते. कमी वयातंच मी काम करायला सुरुवात केली. विचार केला की आधी सगळ्या भावडांचं व्यवस्थित करेन. मग बहीणीचं लग्न केलं. तिला मुलं झाली. ते सांभाळण्याची जबाबदारी मग माझ्यावर आली. अशा प्रकारे वेळ निघून जात होती.'

लता मंगेशकर यांना न्युयॉर्क युनिवर्सिटी सोबतंत अनेक विद्यापिठांकडून नावाजलं गेलं आहे. लता दीदी यांना त्यांच्या सिनेकारकिर्दीत खुप सन्मान मिळाला. त्या फिल्म इंडस्ट्रीतील पहिल्या महिला आहेत ज्यांना भारतरत्न आणि दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.   

lata mangeshkar birthday here lesser known facts about her  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lata mangeshkar birthday here lesser known facts about her