Laxmikant Berde: विनोदाचा बादशाह होणं सोप्पं नव्हतं, लक्ष्मीकांत बेर्डे स्ट्रगल स्टोरी बघाच!

महाराष्ट्राचा लाडका 'लक्ष्या' कसा घडला, याची थोडक्यात माहिती..
Laxmikant Berde birth anniversary his struggle story
Laxmikant Berde birth anniversary his struggle storysakal

Laxmikant Berde Birth Anniversary : मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणारे अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मित्रांनी ''दोस्ती तुटायची नाही'' म्हणत अनेक चित्रपट गाजवले. या मित्रांपैकी एका अढळताऱ्याने म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लवकरच एक्झिट घेतली. पण त्यांच्या स्मृति आजही आपल्या मनात आहेत. आज 26 ऑक्टोबर रोजी त्यांचा जन्मदिन. आज ते आपल्यात नसले तरी त्यांची कला. त्यांचे चित्रपट, आठवणी सगळं काही आपल्यासोबत आहे आणि कायम राहणार आहे. पण एका साधारण 'लक्ष्या'चा विनोदाचा बादशाह इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांची स्ट्रगल स्टोरी..

(Laxmikant Berde birth anniversary his struggle story)

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. त्यांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, 'यशाच्या शिखरावर असताना थोडी थंडी वाजते पण प्रेक्षकांच्या मायेची एवढी उब आहे की, ही थंडी काहीच वाटत नाही. मी रस्त्यावर लॉटरीची तिकीटं विकायचो. दिवाळीला उटणं विकायचो, उदबत्ती विकायचो. मला तेव्हा चांगले कपडे घालायची हौस होती. मग कुठून पैसे आणायचे? असा प्रश्न पडायचा. मग मी स्वत:च्या कमाईनं हे सर्व करुन कपडे घेत होतो.'

Laxmikant Berde birth anniversary his struggle story
Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात अमृता फडणवीस गाणार का? खास एंट्री!

पुढे ते म्हणाले होते, 'लॉटरीची तिकीटं विकत असताना असं वाटलं नव्हतं की, कधीतरी माझाच फोटो लॉटरीच्या तिकीटावर येईल. त्यांच्या घरातील गरीबी सांगताना ते म्हणाले होते, 'आमच्या घरातील गरिबी मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर कधीच पाहिली नाही. ती सतत हसत असायची. त्यामुळे मी लहानपणापासूनच ठरवलं होतं की, दु:ख असलं तरी ते मनात ठेवायचं आणि नेहमी हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं. त्यामुळे विनोद हा माझ्या अंगात निर्माण झाला. '

Laxmikant Berde birth anniversary his struggle story
Prathamesh Parab: खऱ्या प्राजक्तासोबत दगडू लावतोय दिवे? प्रथमेशचे फोटो व्हायरल!

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या कारकिर्दीत सुरुवातीला नाटक आणि मग सिनेमा केले. त्यांचे टुरटुर आणि शांतेचं कार्टं चालू आहे ही नाटक आजही लोकांच्या स्मरणात आहे. केवळ मराठीच नाही तर हिन्दीतही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. मराठी धूमधडाका, गडबड घोटाळा,दे दणादण, अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, आयत्या घरात घरोबा असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. 16 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांची किर्ती मात्र कायम स्वरूपी स्मरणात राहणारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com