लॉकडाऊनचा सदुपयोग करायचाय?तर मग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय श्री श्री रविशंकर यांचं मार्गदर्शन..

ravishankar ji
ravishankar ji

मुंबई- कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे..देशभरात आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा यामुळे मृत्यु झाला आहे...यावर खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवसांपूर्वीच सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं...कोरोना विरुद्ध लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारच्या निर्णयाचं स्वागत करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे..अशावेळी गरजेचं असते ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग..याचा अर्थ कुठेही एकत्र न जमता, बाहेरील कोणाही व्यक्तिच्या संपर्कात न येता घरात राहणं..मात्र २१ दिवसांचं हे लॉकडाऊन प्रत्येकासाठी कंटाळवाणं होऊ लागलंय..या दरम्यान घरात बसून काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडलाय..आणि म्हणूनंच सकाळ माध्यम समुह तुमच्यासाठी घेऊन आलाय एक खास संधी..

या लॉकडाऊनचा उपयोग अनेक जण घरच्या घरी काहीतरी नवीन प्रयोग करुन करत आहेत..कोणी स्वयंपाक घरात वेळ घालवत आहे, कोणी नवीन पुस्तकं वाचत आहेत तर काहीजण स्वतःमधील कलागुणांना वाव देताना दिसत आहेत..या सगळ्यासोबतंच तुम्हाला या लॉकडाऊनचा सदुपयोग कसा करता येईल यासाठी एक योग्य संधी आहे..कारण या लॉकडाऊनचा सदुपयोग घरी बसुन कसा कराल याविषयी खास युवकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत गुरुदेव श्री श्री रविशंकर जी...

होय..'साम' आणि 'सकाळ माध्यम समुहा'चे 'यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क' बुधवार, ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजू १० मिनिटांनी यीन (YIN) या ऑफिशिअल फेसबुक पेजवरुन लाईव्ह जाणार आहेत...यावेळी श्री श्री रविशंकरजी या फेसबुक लाईव्ह मार्फत खास करुन युवकांना या लॉ़कडाऊनचा घरबसल्या सदुपयोग कसा करायचा? यावर मार्गदर्शन करतील...

तेव्हा तुम्हालाही या लॉकडाऊनचा कंटाळा आला असेल आणि घरबसल्या योग्य मार्गदर्शन हवं असेल तर या फेसबुक लाईव्हमध्ये आवर्जुन सहभागी व्हा..  

live interaction with sri sri ravi shankar regarding what to do in lockdown on yin fb page

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com