Lock Upp: चक्क कंगनानं मागितली माफी, असं काय झालं?|Lock Upp Tv Entertainment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Lock Upp: चक्क कंगनानं मागितली माफी, असं काय झालं?

Tv Actress: बॉलीवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंगनाचा लॉक अप (Lock Upp) नावाचा शो सध्या चर्चेत आला आहे. त्यामधील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता कंगना तिच्या माफीनाम्यामुळे चर्चेत आली आहे. चक्क (Kangana Ranaut) कंगनान कुणाची माफी मागणं हे तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्ट होती. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त असलेल्या (Bollywood News) कलाकारांमध्य कंगनाच्या नावाचा समावेश होतो. तिनं यापूर्वी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. त्यामध्ये प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाचा समावेश आहे. जावेद अख्तर संबंधित प्रकरण हे सध्या कोर्टात सुरु आहे. कोर्टानं देखील कंगनाला अनेकदा तिच्या वागण्यामुळे आणि बेताल बोलण्यामुळे फटकारल्य़ाचे दिसून आले आहे.

कंगनाच्या लॉक अप नावाच्या शो मध्ये आजमा फल्लाह आणि जिशान यांच्यात जोरदार वाद सुरु झाला होता. त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाचा लॉक अप नावाचा शो त्याच्या हटकेपणामुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आला आहे. त्यामध्ये भारताच्या टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील जे वादग्रस्त सेलिब्रेटी आहेत त्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. सायशा शिंदे, पुनम पांडे, तेहसीन पुनावाला, यांच्यासह इतर अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं सिक्रेट यावेळी शेयर करायचं ते जर लोकांना आवडलं तर तुमचा त्या शो मधील सहभाग निश्चित अशी साधारण या शो ची संकल्पना आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे.

हेही वाचा: तुमच्या मुलांना Basic Social Manners आहेत का? नसतील तर नक्की शिकवा

जिशान आणि आजमाची जोरदार भांडणं झाल्यानंतर कंगनानं नाराजी व्य़क्त केली होती. आम्हाला तुमच्याकडून अशाप्रकारची अपेक्षा नसल्याचे कंगनानं यावेळी सांगितले होते. जजमेंट डे वर कंगनानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये ती म्हणते, उर्वरीत स्पर्धकांमध्ये सध्या कमालीचा तणाव आहे. मला आजमाविषयी सहानुभूती आहे. त्याबद्दल मी तिची माफी मागते. या शब्दांत कंगनानं तिची माफी मागितली आहे. दुसरीकडे तिनं मुनव्वरचा क्लास घेत त्याला इतरांची टिंगल केल्याप्रकरणी सुनावले आहे.

हेही वाचा: Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

Web Title: Lock Upp Tv Entertainment Show Actress Kangana Ranaut Apology Lajma Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top