LockUpp: बाई की पुरुष यात अडकली होती सायशा,शारिरीक संबंधांविषयी मोठा खुलासा LockUpp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LockUpp: saisha shinde was in a throuple relationship

LockUpp: बाई की पुरुष यात अडकली होती सायशा,शारिरीक संबंधांविषयी मोठा खुलासा

कॉन्ट्रोवर्सीनं भारलेला लॉकअप हा रिअॅलिटी शो जसा फिनालेच्या दिशेनं प्रवास करत आहे तसतसा याची अधिक चर्चा रंगलेली दिसून येत आहे. यामध्ये सहभागी झालेले कंटेस्ट्ंट्स एकतर भांडताना दिसत आहेत किंवा मग त्यांच्या आयुष्यातील एखादा धक्कादायक खुलासा करताना दिसत आहेत. यातच आता ट्रान्सजेंडर सायशा शिंदेनं स्वतःचा एक अनुभव शेअर केला आहे. यामध्ये तिनं सांगितलं आहे की,तिचं एका बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलेल्या कपलसोबत एकाचवेळेस थ्रुपल रिलेशनशीप होतं. तिच्या म्हणण्यानुसार ती या नात्यात सायशा बनण्याआधीपासूनच होती.

हेही वाचा: Video: शिल्पानं एअरपोर्टवरच सुरु केला Workout; फिटनेस मंत्राही केला शेअर

पायल रोहातगीसोबत बातचीत करताना सायशा म्हणाली,''मला आठवतंय की मी माझे पाच सीक्रेट्स इथे सांगितलेयत त्यातला शेवटचा थ्रुपल वाला आहे. मी एका बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसोबत रीलेशनशीपमध्ये होते. आणि मी त्या नात्यात एका राणीसारखी होती. ते दोघे जेवढं एकमेकांवर प्रेम करत होते,त्यापेक्षा अधिक त्यांचं माझ्यावर प्रेम होतं''. सायशा पुढे म्हणाली, ''तसं पाहिलं तर ही सायशा बनण्याआधीची गोष्ट आहे. जेव्हा मी सायशा बनले तेव्हा मी जगासमोर सुरुवातीला स्वतःचं बदलेलं रुप आणलंच नाही. तेव्हा खूप असुरक्षित भावना मनात होत्या. मला वाटायचं की मी लोकांसमोर बिना मेकअप जाऊ शकते की नाही? याविषयी मनात संकोच होता. मला वाटायचं मेकअप नाही केला तर मी पुरुष होते हे कळलं तर कारण..''असे अनेक प्रश्न मनात घर करुन होते.

हेही वाचा: प्रसिद्धीनंतरही काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक नाराज, म्हणाले,'Wikipedia वर...'

सायशाने त्या वेळेची आठवण काढली ज्यावेळी ती स्वप्निल शिंदे होती आणि स्वतःला समलैंगिक समजत होती. ''सायशा बनायचा हा निर्णय जोपर्यंत मी घेतला नव्हता तोपर्यंत मानसिक पातळीवर माझी खूप वाईट परिस्थिती झाली होती. माझा स्ट्रगल काळ होता तो. 'लॉकअप' शो नं माझ्यात खूप आत्मविश्वास निर्माण केला असं सायशा नेहमूी म्हणताना दिसते. आता संपूर्ण जगानं मला बिना मेकअप पाहिलं आहे. मी हे शब्दात नाही मांडू शकता की 'ल़ॉकअपनं' माझ्यासाठी किती मोठं काम केलंय,मी या शो ची आभारी आहे'' असंही सायशानं म्हटलं आहे.

हेही वाचा: कोणी दुबईत तर कोणी मुंबईत...बॉलीवूडकर कसं करणार ईदचं सेलिब्रेशन?

ट्रान्सजेंडर असलेली सायशा शिंदे एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. तिनं बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. करिना कपूर खान,सनी लिओनी, भूमी पेडणेकर,हिना खान यांच्यासाठी सायशानं काम केलं आहे.

Web Title: Lockupp Saisha Shinde Was In A Throuple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top