लग्नानंतर कठीण बनलं होतं माधुरीचं आयुष्य..,पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाली..Madhuri Dixit on Married Life | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhuri Dixit with husband shriram Nene

Madhuri Dixit: लग्नानंतर कठीण बनलं होतं माधुरीचं आयुष्य..,पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाली..

Madhuri Dixit: ८० आणि ९० च्या दशकात माधुरी दिक्षितनं हिंदी सिनेमावर राज्य केलं. त्यावेळी सगळ्यात अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव पहिलं घेतलं जायचं. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करून माधुरी अमेरिकेला शिफ्ट झाली तेव्हा तिचे चाहते खूप नाराज झाले होते.

श्रीराम नेने व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यांना २ मुले अरिन नेने आणि रैयान नेने आहेत. अमेरिकेला जाऊन माधुरी आपल्या कुटुंबासोबत बिझी झाली. जेव्हा मुलं थोडी मोठी झाली तेव्हा ती आपल्या पतीसोबत भारतात परतली. आणि त्यानंतर ती पुन्हा अभिनयात सक्रिय झाली. पहिल्यांदाच माधुरीनं लग्नानंतर बदलेल्या तिच्या आयुष्यावर बोलत अनेक खुलासे केले आहेत.(Madhuri Dixit Shares experience after marriage with shriram nene)

माधुरीन श्रीराम नेने यांच्या युट्युब चॅनेलवर सांगितलं आहे की,''तुम्हा डॉक्टरांचे जे आयुष्य आहे ते खूप धावपळीचं असतं. मग दिवस असो की रात्र..तुमचा संपूर्ण दिवस हा कॉलवरच अनेकदा जातो''.

माधुरी पुढे म्हणाली,''अनेकदा हे खूप कठीण होऊन बसतं जेव्हा तुम्ही मुलांना पाहता,त्यांना शाळेत सोडता,पुन्हा घेऊन येता आणि घरातील इतरही गोष्टी करता. जेव्हा तुमची गरज असते तेव्हा तुम्ही कुटुंबासोबत नसता. कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता. कधी मी आजारी असते तेव्हा तुम्ही तिथे नसता कारण तुम्हाला कुणा इतराची काळजी घ्यावी लागते. तर या सगळ्या अशा कठीण गोष्टी माझ्या वाट्याला आल्या''.

लग्नानंतर बदललेल्या आयुष्यावर बोलताना पुढे माधुरी म्हणाली,'' आयुष्य कठीण जरी बनलं होतं..तरी लग्नानंतर मी माझं आयुष्य खऱ्या अर्थाने जगले कारण मी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पुढे काय करणार माहित नव्हतं. आम्ही खूप ट्रॅव्हल केलं..अॅडव्हेंचर स्पोर्ट्स एन्जॉय केले..जे मी पहिलं ते मी आधी कधीच केलं नव्हतं. यामुळे माझं आयुष्य अधिक समृद्ध बनलं. आणि मी अधिक चांगली व्यक्ती बनले''.

माधुरीचा 'मजा मा' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला. सिनेमाला आनंद तिवारीनं दिग्दर्शित केलं आहे. माधुरी व्यतिरिक्त यामध्ये गजराज राव,रित्विक भौमिक,बरखा सिंग,सृष्टि श्रीवास्तव,रंजीत कपूर,शीबा चड्ढा आणि सिमोन सिंग सारखे कलाकार आहेत.