सेक्रेड गेम्सच्या राजश्रीकडून उद्धव यांचं कौतूक, सांगितला औरंगाबादचा किस्सा!

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. यासगळ्याचे
rajshri deshpande news
rajshri deshpande news esakal

Maharashtra Political Crisis: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. यासगळ्याचे मोठे पडसाद राज्यातील राजकीय घडामोडींवर पडले आहेत. त्यात (political news) वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटींनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये मराठी - हिंदी भाषेतील अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. आता सेक्रेड गेम्समधील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ही आता तिच्या एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचे कळताच राजश्री कमालीची भावूक झाली (entertainment news) आहे. तिनं ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राजश्रीनं आदित्य ठाकरेंचा एक प्रसंगही सांगितला आहे. राजश्री काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत. 2019 मध्ये मराठवाड्यातील शाळांच्या दयनीय स्थितीबद्दल आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी मी औरंगाबादमध्ये असून त्यावर बोलू. असे सांगितले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांचा नम्रपणा पाहून मी कमालीची भारावून गेले होते. त्यांची माणूसकी ही प्रभावित करणारी आहे. माझ्या मनात ती कायम राहील. असे राजश्रीनं म्हटलं आहे.

rajshri deshpande news
Video : Eknath Shinde गटातील सर्व आमदार पहिल्यांदाच Radisson Blu हॉटेलातून बाहेर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणानं दिशा बदलली आहे. महाविकास आघाडीचे सरकार जावून त्याजागी भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंता पसरली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आघाडी सरकारची धडधड वाढली होती. शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून ते सत्तेत मोठ्या पदावर विराजमान होणार असल्याची चर्चा आहे.

rajshri deshpande news
'नागिन 6' Viral Video: शूटिंग सुरु असताना सेटवर पोहोचला खरा नाग अन् मग ..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com