'नागिन 6' Viral Video: शूटिंग सुरु असताना सेटवर पोहोचला खरा नाग अन् मग ..

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच मालिकेत काम करणाऱ्या तेजस्वी प्रकाशचे चाहते मात्र चिंतेत पडलेयत.
Real Snake on the sets of Nagin 6,tejasswi prakash show-watch video
Real Snake on the sets of Nagin 6,tejasswi prakash show-watch videoInstagram

एकता कपूरची प्रसिद्ध टी.व्ही मालिका 'नागिन 6'(Nagin6) मध्ये सापच साप पहायला मिळतात. पण काही दिवसांपूर्वी या मालिकेचं मुंबईतील एका स्टुडिओत शूटिंग सुरू असतात मोठा गोंधळ उडाला,जो तो जीव मुठीत घेऊन पळू लागला. कारण या सेटवर स्टुडिओच्या बाजूलाच असलेल्या गर्द झाडीतून एक खराखुरा नाग पोहोचला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्याला पाहून मालिकेत नागिनची मुख्य भूमिका करणाऱ्या तेजस्वी प्रकाशच्या (Tejasswi Prakash)चाहत्यांचं टेन्शन मात्र वाढलं आहे. या मालिकेत तेजस्वी प्रथा नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. चला जाणून घेऊया सेटवर नाग पोहोचल्यावर नेमकं काय घडलं?(Real Snake on the sets of Nagin 6,tejasswi prakash show-watch video)

सोशल मीडियावर(Social media) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल(Video Viral) होतोय. बोललं जात आहे कि 'नागिन 6' च्या सेटवरचा हा व्हिडीओ आहे,जिथे तेजस्वी प्रकाशच्या मालिकेचं शूटिंग सुरु होतं. सेटवर अचानक एक भलामोठा नाग पोहोचला,ज्याला पाहून सगळ्यांना दरदरवून घाम सुटला. तिथे उपस्थित टीम मेंबर्सनी प्रयत्नपूर्वक नागाला एका लाकडी दांड्याच्या मदतीनं पकडलं आणि योग्य ठिकाणी पुन्हा नेऊन सोडलं.

Real Snake on the sets of Nagin 6,tejasswi prakash show-watch video
रिलीज आधीच शाहरुखचा 'जवान' जाऊन बसला करोडोच्या क्लबमध्ये, वाचा सविस्तर

हा व्हिडीओ समोर येताच तेजस्वी प्रकाशते चाहते मात्र चिंतेत पडलेयत. चाहते कमेंट करुन आपल्या लाडक्या अभिनेत्रीला काही झालं तर नाही न याची चौकशी करताना दिसत आहेत. चाहत्यांनी तेजस्वीला आपली काळजी घ्यायचा सल्ला देखील दिला आहे. पण बातमी कळतेय की,सेटवर या अचानक आलेल्या नागामुळे कोणालाही काही इजा झालेली नाही. सगळे सुरक्षित आहेत.

तेजस्वी प्रकाश विषयी जाणून घ्यायचं झालं तर ती आपल्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. टी.व्ही अभिनेता करण कुंद्राला ती सध्या डेट करतेय, तिनं 'बिग बॉस १५' ची विजेती म्हणून देखील नाव कमावलं आहे. त्या शो मध्येच ती पहिल्यांदा करणला भेटली होती. दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची पसंती देखील मिळालेली होती. त्या दोघांचे फॅन फॉलॉइंग दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com