कधी कधी अपराधी वाटते कारण.. लेकाच्या वाढदिवसाला हास्यजत्रा फेम Namrata Sambherao झाली भावुक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव
namrata sambherao, maharashtrachi hasyajatra, namrata sambherao news
namrata sambherao, maharashtrachi hasyajatra, namrata sambherao newsSAKAL

Namrata Sambherao News: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शो मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताने आजवर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केलंय.

नम्रता हास्यजत्रेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असली तरीही ती शुटिंगमधून वेळात वेळ काढत तिच्या फॅमिलीला सुद्धा तितकंच महत्व देत असते. नम्रताचा मुलगा रुद्राजचा आज वाढदिवस आहे.

(maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao emotional post on her son rudraaj birthday)

namrata sambherao, maharashtrachi hasyajatra, namrata sambherao news
Kiran Mane: तिची आणि माझी मैत्री फक्त कॉन्टेन्टसाठी... म्हणत राखीच्या मैत्रीवर किरण मानेंनी सोडलं मौन

त्यानिमित्ताने नम्रताने लाडक्या लोकांविषयी सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. नम्रता लिहिते.. आज आमच्या बाळाचा वाढदिवस.

आम्ही दोघांनी ठरवलं थोडं जगून घेऊया थोडा वेळ जाऊदे मग चान्स घेऊया, जगलो हसलो रडलो भांडलो आता जरा आई बाप व्हायचा स्टान्स घेऊया, वाटलं एखादं लेकरू असावं ज्याला कडेवर घेऊन मिरवावं त्याने आई म्हणत उराशी बिलगावं...!

namrata sambherao, maharashtrachi hasyajatra, namrata sambherao news
Abdu Rozik: छोटा भाईजान अब्दू अजूनही भारतातच.. दिल्लीतील हजरत निझाम दर्ग्यात नमाज पठण

नम्रता पुढे लिहिते.. एक मात्र मला कळून चुकलं, तुम्ही लेकरं आमच्या इच्छेनुसार नाही तर तुमच्या इच्छेनुसार आयुष्यात येता आणि आम्हा आई बापाच्या जगण्याला खरा अर्थ देता.. आणि मग स्वप्न आमचं पूर्ण झालं, उदरी माझ्या लेकरू आलं .. त्याच्या येण्याने एक आवर्तन पूर्ण झालं

रुद्राजच्या जन्मानंतर नम्रता सुरुवातीच्या काळातला भावुक अनुभव लिहिते कि.. पूर्वी वाटायचं हा मला जीव लावेल का.. मी कामावर गेले कि माझ्या मागे धावेल का.. पण माझ्या शिवाय त्याच आता पान हलत नाही …

मी कामाला गेले कि तुझ्याविना माझं मन रमत नाही … कधी कधी मनात खूप अपराधी भावना येते.. पण हे सगळं प्रत्येक आई आपल्या बाळा साठीच तर करते.. प्रत्येक वेळी त्याच्या आई ह्या हाकेने माझा उर भरून येतो..

नम्रता शेवटी लिहिते.. आई अंगाई म्हण ना ह्या वाक्याने कंठ माझा दाटून येतो.. आई मी तुझ्या कुशीत झोपू म्हणजे मला झोप लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र माझी झोप उडते.. मग त्याच्या कुशीत जाऊन कधी कधी मी एकटीच रडते..

त्याच हसणं बघितलं कि आयुष्य माझं वाढतं.. आणि एका गोड बाळाची आई म्हणून थोडं मूठभर मांस देखील चढतं... I LUBLU RUDRAAJ" अशी पोस्ट लिहून नम्रताने रुद्राजविषयी भावना व्यक्त केल्यात. काम करत घर आणि मुलांना संभाळणाऱ्या प्रत्येक महिलेची हि कहाणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com