Mahesh Bhatt Birthday: मोठ्या मुलीचं घेतलं चुंबन, धाकट्या आलियाचा वेगळा अनुभव

राज. जिस्म, पाप, मर्डर सारख्या बोल्ड चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक महेश भट्ट यांचा बॉलीवूडमधील प्रवास भलताच वादग्रस्त राहिला आहे.
Mahesh Bhatt Birthday
Mahesh Bhatt Birthday

Mahesh Bhatt Happy Birthday: राज. जिस्म, पाप, मर्डर सारख्या बोल्ड चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक महेश भट्ट यांचा बॉलीवूडमधील प्रवास भलताच वादग्रस्त राहिला आहे. आज त्यांचा जन्मदिवस असून त्यानिमित्तानं भट्ट (Alia Bhatt News) यांचा रंगीबेरंगी प्रवास आपण जाणून घेणार आहोत. महेश भट्ट हे 73 वर्षांचे झाले आहेत. बॉलीवूडमधील प्रथितयश दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव (bollywood celebrity) घेतले जाते. महेशजी हे सतत वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असणारे दिग्दर्शक आहेत. वैयक्तिक कारणास्तव त्यांना चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला होता.

महेश भट्ट हे आता आजोबा होणार आहे. त्यांची धाकटी मुलगी आलिया लवकरच आई होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. महेश हे त्यांच्या थोरल्या मुलीच्या पुजा भट्टवरुन चर्चेत आले होते. त्या गोष्टीला बराच कालावधी लोटला असला तरी महेश भट्ट आणि पुजा भट्ट यांच्या किसिंगचा फोटो तेव्हा चांगलाच चर्चेत आला होता. त्यावरुन त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. एका मॅगेझीनसाठी त्यांनी हे फोटोशुट केलं होतं. ते जेव्हा व्हायरल झाले तेव्हा भट्ट यांना मोठा धक्का बसला होता.

असं म्हणतात की, ते बराचकाळ घराबाहेर देखील पडले नव्हते. आता धाकट्या आलियानं वडिलांबद्दलचा वेगळा अनुभव यावेळी सांगितला आहे. आलियानं यापूर्वी एका मुलाखतीमध्ये आपले आणि वडिलांचे खास बाँडिंग असल्याचे म्हटले आहे. मला त्यांची फार वाट पाहावी लागत असे. मात्र मी त्यांना काही मिस केले नाही. ते नेहमीच त्यांच्या प्रोजेक्टच्या निमित्तानं बाहेर असत. आता बऱ्याच वर्षानंतर ते आमच्याबरोबर टाईम स्पेंड करत आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. जेव्हा मी चित्रपटामध्ये आले तेव्हापासून आमच्यात फ्रेंडशिप झाली आहे.

Mahesh Bhatt Birthday
Emran Hashmi : सलमानशी घेतलाय पंगा, जीममध्ये सुरुय कसरत!

त्या चॅट शोमध्ये आलियानं म्हटलं होतं की, जेव्हा मी बॉलीवूडमध्ये आले तेव्हा मला कळून चुकलं की, माझ्या वडिलांना किती त्रास झाला असेल. या क्षेत्रामध्ये खूप काळ प्रतिक्षा करावी लागते. त्यासाठी तुमच्याकडे संयम असावा लागतो. त्यांनी तो ठेवला. ते यशस्वी झाले. भलेही त्यांच्यावर टीका झाली आहे. मात्र त्यांनी त्याचा नेहमीच खुल्या मनानं स्विकार केल्याचे आलियानं यावेळी सांगितलं आहे.

Mahesh Bhatt Birthday
Kate Winslet Update: टायटॅनिकच्या 'रोझ'च्या प्रकृतीत सुधारणा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com