Bollywood Actress: बॉलीवूडची ही प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्री असलेली जॅमी लिव्हर म्हणजे आपल्या जॉनी लिव्हर यांच्या लेकीनं काही वेळ आधीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जॅमी प्रियंका चोप्रा पासून करिना कपूर,सोनम कपूर पर्यंत सगळ्यांची नक्कल करताना नजरेस पडतेय.
खास गोष्ट ही आहे की या व्हिडीओमध्ये जॅमी लिव्हरनं दाखवलं आहे की बॉलीवूड अभिनेत्री आपल्या मुलांसोबत घरात कशाप्रकारे वागतात. खासकरुन तेव्हा.. जेव्हा त्या मुलांना झोपवत असतात.(Priyanka chopra to Kareena Kapoor all Bollywood Sexy Mom behaviour with their kids jamie lever mimic video viral)
जॅमी लिव्हरचे वडील जॉनी लिव्हर यांचे चाहते जगभरात आहेत. ते एक दर्जेदार कॉमेडियन आहेत. जॅमीनं आपल्या नवीन व्हिडीओत करिना कपूरची नक्कल करत म्हटलं आहे, ''झोप लवकर बाळा कारण पॅप्स सकाळी येणार आहेत..'', इथे जॅमी करीनाच्या 'पू' व्यक्तिरेखेचा हेल काढून बोलताना दिसत आहे.
यानंतर जॅमी व्हिडीओत सोनम कपूरची नक्कल करताना दिसते. अभिनेत्रीची नक्कल करताना जॅमी Gucci,Prada,Louis Vuitton सारख्या बड्या ब्रॅन्डचं नाव घेत आहे. चला,हा मजेदार व्हिडीओ देखील बातमीत जोडलेला आहे एकदा पाहूनच घ्या.
यानंतर जॅमी आपल्या व्हिडीओत प्रियंका चोप्रा आणि फराह खान यांची देखील नकल करताना दिसते. चाहत्यांना जॅमीचा हा व्हिडीओ भलताच पसंत येत आहे. काहीच वेळाच जॅमीच्या या व्हिडीओला ६ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
यावरनं आपण अंदाज लावू शकता की या व्हिडीओला किती पसंती मिळत आहे. चाहतेच नाहीत तर रवीना टंडनने देखील जॅमीच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिची प्रशंसा केली आहे. रवीना व्यतिरिक्त प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेंस लुईसने देखील व्हिडीओला लाइक केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.