Makeup Review : मनोरंजक, हसवणारा तरीही शेवटी रडवणारा !

संतोष भिंगार्डे
Friday, 7 February 2020

"बालक पालक', "यलो', "बाळकडू' अशा काही चित्रपटांचे खुमासदार शैलीत लेखन करणारे लेखक गणेश पंडित.एक वेगळा विषय ते घेऊन आले आहेत. हा चित्रपट तद्दन मनोरंजन करणारा असला...हसविणारा असला तरी रडवणाराही आहे.

मुंबई : "बालक पालक', "यलो', "बाळकडू' अशा काही चित्रपटांचे खुमासदार शैलीत लेखन करणारे लेखक गणेश पंडित. नेहमीच काही तरी वेगळं देण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. विविध विषय त्यांच्या लेखणीद्वारे पडद्यावर आलेले आहेत. आताच्या मेकअप या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले आहे. एक वेगळा विषय ते घेऊन आले आहेत. हा चित्रपट तद्दन मनोरंजन करणारा असला...हसविणारा असला तरी रडवणाराही आहे.

Big Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी' च्या चाहत्यांसाठी खुशखबर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Makeup. @chinmayudgirkar .#poster2.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

ही कथा आहे बिनधास्त आणि चुलबुली अशा पूर्वी (रिंकू राजगुरू)ची तसेच नील (चिन्मय उद्‌गीरकर)चीही. पूर्वी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. ती आपल्या आजी तसेच तिचे आई-बाबा व भावासह राहात असते. पूर्वीचे आता लग्नाचे वय झालेले असते. साहजिकच घरची मंडळी तिचे लग्न ठरविण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही ना काही कारणास्तव तिचे लग्न जुळत नाही. किंबहुना पूर्वीचाच लग्नाला विरोध असतो. अशातच तिची ओळख नीलशी होते. नील तसा शांत व सरळसाध्या स्वभावाचा मुलगा. तो अमेरिकेतून डॉक्‍टरी शिकून आलेला असतो. त्याचे कुटुंब हायफाय असते. तो मम्माज बॉय असतो. हळूहळू नील व पूर्वी एकत्र येतात. त्या दोघांचे स्वभावही भिन्न असतात. पूर्वी खूप धाडसी आणि बेधडक स्वभावाची मुलगी. तर नील साध्या स्वभावाचा मुलगा. तरीही त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण होते आणि एके दिवशी त्या दोघांचे लग्नही ठरते. ठरल्याप्रमाणे लग्नाची वरात निघते आणि मग काय होते ते पडद्यावर पाहाच. दिग्दर्शक गणेश पंडित यांनी एक तजेलदार आणि खुमासदार असा चित्रपट आणला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

पुर्वी

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकू राजगुरू, चिन्मय उद्‌गीरकर, प्रतीक्षा लोणकर, राजन ताम्हाणे, मिलिंद सफई, सुमुखी पेंडसे, तेजपाल वाघ, संकेत मोरे आदी कलाकारांनी उत्तम काम केले आहे. विशेष बाब म्हणजे रिंकूने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे. लग्न मोडतीचा कराव्या लागणाऱ्या खटपटी व लटपटी तसेच मला मेकअपवुमन व्हायचे आहे असे बिनधास्त उत्तर देण्याची तिची स्टाईल लय भारीच. चिन्मय उद्‌गीरकरचा नील कमालीचा भाव खाऊन जाणारा आहे. पहिल्यांदा सरळ व साधा स्वभाव आणि त्यानंतर त्याच्या स्वभावात झालेले परिवर्तन त्याने कमालीचे साकारले आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शकाने चांगले काम करून घेतले आहे.

'वन नाईट स्टॅंड' च्या करीनाच्या प्रश्नावर साराचं 'हे' उत्तर

चित्रपटातील संवाद चुरचुरीत आहेत. त्यामुळे हशा नक्कीच पिकतो. "कसे निराळे हे करार प्रेमाचे' हे गाणे छान. मात्र तरीही चित्रपटात काही त्रुटी जाणवतात. काही सीन्स कमालीचे ताणले गेलेले आहेत. त्यामुळे साहजिकच निराशा होते आणि फारशी उत्कंठाही राहात नाही. मध्यांतरापूर्वी चित्रपट हसवितो आणि नंतर रडवितोही. एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे.

स्टार : तीन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makeup movie review