मलाईका अरोराने स्विमिंग पूलमध्ये केला योगा, सोबत फायदेही सांगितले

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 5 January 2021

मलाईका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. ती भले सुट्या एन्जॉय करत असली तरी योगाला मात्र ब्रेक देत नाही.

मुंबई-  बॉलीवूडची मुन्नी म्हणजेच मलाईका अरोरा सध्या गोव्यामध्ये बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. सोशल मिडियावर दोघांचे गोवा ट्रीपमधील फोटो देखील व्हायरल होत आहेत. सोशल मिडियावर मलाईकाने एकानंतर एक तिचे हॉट फोटो शेअर करत चाहत्यांची झोपंच उडवली आहे. आता मलाईकाने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती पाण्याच्या मधोमध योगा करताना दिसतेय. 

हे ही वाचा: कपिल शर्माने शेअर केली गुडन्युज, ट्विटमागच्या सिक्रेटचा केला खुलासा  

मलाईका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. ती भले सुट्या एन्जॉय करत असली तरी योगाला मात्र ब्रेक देत नाही. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तीने बिकनी घातली असून ती स्विमिंग पूलमध्ये दिसतेय. विशेष म्हणजे तिने स्विमिंद पूलमध्येही तिचं योगा करणं काही सोडलेलं नाही. तिने पाण्याच्या मधोमध हा योगा करत असलेला फोटो पोस्ट करत त्याचे फायदे देखील सांगितले आहेत. 

मलाईकाने तिचा हा पाण्यामधील योगा करतानाचा फोटो पोस्ट करत म्हटलंय, 'या योग प्रकाराचं नाव आहे उत्थिता हस्ता पादांगुष्ठासन योग.' तिने तिच्या पोस्टमध्ये या योगप्रकाराविशयी सविस्तर लिहिलं आहे. यासोबतंच तिने एक नोट देखील शेअर केली आहे ज्यामध्ये तिने म्हटलंय, 'चला नवीन वर्षात वर्कआऊट आणि योगा रुटीनची किक स्टार्ट करत नवीन आठवड्याची सुरुवात करुया. '

मलाईका तिच्या फिटनेसविषयी खुप सतर्क असते. लॉकडाऊनमध्येही ती सतत लोकांना फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती. मलाईकाची खास गोष्ट अशी की ती केवळ पदार्थ किंवा योगा यांचे नुसते फोटो शेअर करत नाही तर त्याचे फायदे देखील सांगेत जे चाहत्यांना उपयोगी पडतात. त्यामुळे तिचे चाहते तिच्या अशा पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.   

malaika arora enters in swimming pool in bikini and doing difficult yoga photo  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malaika arora enters in swimming pool in bikini and doing difficult yoga photo