ज्या कपड्यांत व्हॅक्सिन घ्यायला गेली, त्यामुळे झाली ट्रोल

सध्या तिच्या कोविड व्हॅक्सिन घेण्याची चर्चा होताना दिसते आहे.
actress malaika
actress malaika Team esakal

मुंबई - आपल्या हॉट अंदाजामुळे (bollwood actress) अनेकांचे लक्ष वेधून घेणारी सेलिब्रेटी (celebrity) म्हणून मलायकाचे (malaika) नाव घेता येईल. तिनं सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोंना आणि व्हिडिओला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सध्या तिच्या कोविड व्हॅक्सिन घेण्याची चर्चा होताना दिसते आहे. मात्र त्यावेळी ती ट्रोलही झाली आहे. याचे कारण तिनं घातलेले कपडे. यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. मलायकानं कोरोनाचं दुसरं (second dose of corona vaccine) व्हॅक्सिन घेतलं आहे. ( malaika arora get second dose of the vaccine and trolled of her clothes share photo)

मलायकानं आपण कोरोनाचं दुसरं व्हॅक्सिन घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्या फोटोंमध्ये तिचे कपडे आपल्याला दिसून येतात. यावरुन तिला नेटक-ऱ्यांनी ट्रोल (trolled) केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) यांना देखील काल नेटकऱ्यांनी अशाच प्रकारे ट्रोल केले होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्राची एक प्रत प्रख्यात गीतकार गुलजार यांना दिली. त्यासाठी त्या त्यांच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा त्यांनाही ट्रोलर्सनं झापलं होत. अनेकांच्या मते, ज्यावेळी सेलिब्रेटी अशाप्रकारचे कपडे घालतात तेव्हा त्यांनी सोशल सेन्सचाही विचार करावा. अशी चाहत्यांची भूमिका आहे.

मलायकानं हे फोटो शेयर करताना असे लिहिले आहे की, जसे मी नेहमीच सांगत असते, आपण सध्याच्या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करायला हवा. त्यात आपल्या सर्वांची भलाई आहे. कोरोनानं काय केलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वांनी व्हॅक्सिन घ्यायला हवे. यासगळ्या परिस्थितीत मी कोरोना योध्द्यांचेही आभार मानते. त्यांच्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. हे सांगायला मलायका विसरली नाही.

actress malaika
तू बोल्ड सीन्सबद्दल प्रियकराला आधी सांगतेस का? तापसी म्हणाली...
actress malaika
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेता उज्वल धनगरचे निधन

कोरोना फ्रंटलाईनर्सचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आपण सर्वांनी त्यांचा आदर करावा. मी त्यांना धन्यवाद देते. मलायका बरोबरच यापूर्वी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाचे व्हॅक्सिन घेतले आहे. त्यात सोनाक्षी सिन्हा, बाबिल खान, फरहान अख्तर, अंकिता लोखंडे, निकिता दत्ता, वरुण धवन सारख्या कलाकारांनी व्हॅक्सिन घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com