'बायकांनी दारु प्यायची नाही का?' मलायकाचा थेट प्रश्न! | Malaika Arora | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika Arora

Malaika Arora: 'बायकांनी दारु प्यायची नाही का?' मलायकाचा थेट प्रश्न!

Malaika Arora Moving in with Malaika social media : मनोरंजन विश्वामध्ये मलायकाची चर्चा होतच असते. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही तिच्या सौंदर्याची भुरळ तरुणांना पडते. इंस्टावर तर मलायकाच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. आता मलायका एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

मलायकाची सध्या मुव्हिंग इन विथ मलायका नावाची सीरिज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. वास्तविक ती मालिका आयएमडीबीच्या रेटिंगमध्ये पिछाडीवर असली तरी त्यामध्ये असलेल्या अनेक सेलिब्रेटींमुळे ती चर्चेचा विषय आहे. फराह खान, मलायकाची बहिण अमृता अरोरा याशिवाय करिना कपूर, नेहा धुपिया यांनी देखील मलायकाविषयी वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात सीमा सजदेहाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Also Read - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सीमा आणि सोहेल खानचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. त्या दरम्यान तिचा एका पार्टीमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात सीमा मद्यपान करुन धुंद झाली होती. तिला तर कशाचीही शुद्ध राहिली नव्हती. अशातच पापाराझ्झींनी तिला फोटोसाठी पोझ देण्यास सांगितले तर तिला ते ही जमेना. सोशल मीडियावर ते फोटोही व्हायरल झाले होते. त्यावरील प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. मलायकानं त्यावर रोखठोकपणे भूमिका मांडली आहे.

हेही वाचा: Malaika Arora: 'मम्मा आता...!' मलायकाचं पोरगं काय बोलून गेलं

बॉलीवूडला पार्ट्यांचे काही वावडे नाही. त्या पार्ट्यांमध्ये अनेक सेलिब्रेटी आऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. सीमा सजदेहचा तो व्हिडिओ अनेकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरतो आहे. तर मलायकानं त्यावर वेगळाच खुलासा करत काही महत्वाचे प्रश्न यनिमित्तानं उपस्थित केले आहेत. मलायका म्हणते, महिलांना बाहेर पडून दारू पिण्याची परवानगी नाही का?

हेही वाचा: Ishita Dutta: दृष्यमची इशिता 'स्वप्नात' आल्याशिवाय राहणार नाही!

दरवेळी महिलांकडे वेगळ्या प्रकारे का पाहिले जाते, त्यांना स्वतःचा वेळ सेलिब्रेट कर करण्याची परवानगी नाही का? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीमाला असं बोललं गेलं की हिचं कोणतंच चारित्र्य नाही. पण आपल्यालाच प्रत्येक गोष्टीमध्ये का जज केलं जातं? असा प्रश्नही मलायकानं यावेळी उपस्थित केला आहे.