काळीज पिळवटून टाकणारी 'माळीण' दुर्घटना मोठ्या पडद्यावर...

२०१४ मध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली. एका रात्री संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. त्या 'माळीण' गावाततील दुर्घटना आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या...
ek hot malin
ek hot malinsakal

त्या घटनेला आज सात वर्षे उलटून गेली पण अजूनही ती दुर्घटना कुणीही विसरलं नाही. ना त्या गावाला विसर पडला, ना महाराष्ट्राला, ना जगाला. तिथे जे घडलं त्याचा धसका जगाने घेतला. 'न भूतो न भविष्यती' अशा या घटनेने लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. ती घटना म्हणजे 'माळीण' दुर्घटना. त्या दिवसापासून 'माळीण' हे नाव जगाच्या इतिहासात कोरलं गेलं. त्याच दुर्घटनेचे स्मरण आणि तिथल्या गावकऱ्यांची व्यथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

ek hot malin
आपण यांना पाहिलंत का, या हॉट अभिनेत्रीची अवस्था पाहून डोळे..

२०१४ साली, जुन्नर तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळली. गाव झोपेत असताना ही दरड कोसळली आणि मोठा अनर्थ झाला. अनेकांचे जीव गेले, घरं गेली, होतं नव्हतं सगळं गेलं. याच दुर्घटनेवर आधारित 'एक होतं माळीण' हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. वास्तवावर आधारित संहिता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान याच्या आधारावर तयार करण्यात आलेला हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वात मैलाचा दगड ठरणार आहे.

ek hot malin
the kashmir files: या चित्रपटाला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा हे दुर्दैव : शरद पवार

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे असून अनेक कलाकारांनी ते शेअर केले आहे. पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे दरड कोसळून संपूर्ण गाव एका क्षणात नाहीसं झालं. लोकांची घरं उध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले. या भीषण दुर्घटनेची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे. घडलेल्या घटनेला तितक्याच सजीवपणे पोहोचवण्यासाठी व्हीएफएक्सचा मोठा वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. माळीण ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन हे कथानक लिहिलं आहे.

ek hot malin
the kashmir files: काल कौतुक आज टीका; पवारांच्या भूमिकेवर विवेक अग्निहोत्री..

ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. व्हीएफएक्स दिवाकर घोडके यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com