लाॅकडाऊननंतर चित्रीकरण पुर्ण करणारा 'हा' आहे पहिला चित्रपट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

मृण्मयी देशपांडेचा दिग्दर्शिका म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने काही नियम व अटींनुसार चित्रीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता चित्रीकरण सुरू होत आहे. टीव्ही मालिकांबरोबरच चित्रपटांचेही चित्रीकरण सुरू झाले आहे. गणराज असोसिएट्स आणि संजय दावरा फिल्म्स निर्मित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाचेसुद्धा चित्रीकरण आता झाले आहे. लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर चित्रीकरण पुर्ण करणारा हा पहिला चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांची प्रमुख भूमिका आहे. अभिजित अब्दे यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. 

शाहरुख खान ऑक्टोबरपासून सुरु करणार 'या' सिनेमाचं शूटींग

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाच्या काही महत्वाच्या दृश्यांच्या चित्रीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रीकरण करणं शक्य झाले नाही. आता ते पूर्ण करण्यात आले आहे. मृण्मयी देशपांडेचा दिग्दर्शिका म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. श्रेयस जाधव या चित्रपटाचा निर्माता आहे. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात कधीही न थांबणारी मनोरंजन सृष्टी थांबली होती. आता मात्र अनलॉकमुळे मनोरंजनसृष्टी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. ऑनलाइन बिनलाईन, बघतोस काय मुजरा कर, मी पण सचिन अशा अनेक वेगळ्या आशय व विषयाच्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या गणराज असोसिएट्सची आणि संजय दावरा फिल्मसची निर्मिती असलेला मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' हा सिनेमाचे जवळ-जवळ पूर्ण चित्रीकरण करून झाले होते. अवघ्या दोन दिवसांच्या आणि महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण लॉकडाऊनमुळे राहून गेले होते. ते अनलॉकची बातमी मिळताच चित्रपटाच्या टीमने ते पूर्ण केले.

लंडनमध्ये रेकाॅर्डिंग झालेल्या पहिल्या गाण्याला झाली चाळीस वर्षे पुर्ण; वाचा माहिती

शासनाने चित्रीकरणाला परवानगी दिली आहे हे कळताच आम्ही सगळेच कामाला लागलो. चित्रीकरण स्थळाची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि सर्व नियम पाळून चित्रीकरण करणार आहोत हे त्यांच्या लक्षात आणून देत आम्ही परवानगी मिळवली, असे चित्रपटाचे निर्माते श्रेयस जाधव यांनी सांगितले. उरलेलं चित्रीकरण कधी करता येईल हे माहितीच नव्हतं तरी नंतर वेळ घालवायचा नाही म्हणून अर्धी तयारी आधीच करून ठेवली होती. प्रत्येक गोष्टीची मांडणी कशी करता येईल या पासून ते कमी लोकांसोबत काम कसे करावे हे सुद्धा आम्ही प्लॅन करून ठेवलं होतं आणि म्हणून हे उरलेलं संपूर्ण चित्रीकरण दोन दिवसात संपवता आलं,'असं दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिवस विशेष : चित्रपटसृष्टीतील कलाकार सांगताहेत योगाचे महत्व....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manache shlok is first film to shoot after lockdown