esakal | आंतरराष्ट्रीय योग दिवस विशेष : चित्रपटसृष्टीतील कलाकार सांगताहेत योगाचे महत्व....
sakal

बोलून बातमी शोधा

yoga special.

भारतात योगाचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढत चालला असून जगभरातून भारतीय योगविद्येकडे सर्व जग आकर्षित होत आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व मोठे आहे. योगामुळे अनेक आजारांवर मात करता येते आणि उत्तम व निरोगी आयुष्य जगता येते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस विशेष : चित्रपटसृष्टीतील कलाकार सांगताहेत योगाचे महत्व....

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : भारतात योगाचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढत चालला असून जगभरातून भारतीय योगविद्येकडे सर्व जग आकर्षित होत आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व मोठे आहे. योगामुळे अनेक आजारांवर मात करता येते आणि उत्तम व निरोगी आयुष्य जगता येते. आपल्या जीवनात योगाचे निश्चितच मोठे योगदान आहे. याबद्द्ल चित्रपटसृष्टीतील कलाकार सांगतोहत आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल...

शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टी हे बॉलीवूडमधील आघाडीचे नाव आणि ती योगासठी खूप प्रसिद्ध आहे. शिल्पाने योगाने विविध व्हिडीओ बनविले आहेत. व्यायाम व योगाविषयक पुस्तकेही काढली आहेत. तिच्या व्हिडीओजना यु ट्यूबवर लाखो लाईक्स मिळतात. योगगुरू बाबा रामदेव यांच्या साथीने शिल्पाने केलेल्या योगाभ्यासाच्या व्हिडीओना मोठा प्रतिसाद मिळत असतो. शिल्पा म्हणते, की जीवनात योगाचे खूप महत्त्व आहे. योगा हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जीवनात फिट अॅण्ड फाईन राहायचे असेल तर योगा आवश्यक आहे.

अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' दोन इमारती ठरतायेत कोरोनाचा हॉटस्पॉट...

बिपाशा बसू : बिपाशा बसूला व्यायामाबरोबरच योगाची खूप आवड आहे. दररोज न चुकता ती योगा करते. विशेष म्हणजे योगाच्या प्रसारासाठी ती जनजागृतीही करते . शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचे महत्व ती इतरांना नेहमी सांगत असते. तिच्या मते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योगा महत्त्वाचा आहे. योगाचे विविध प्रकार आहेत आणि ते मी नेहमीच करीत असते.

मलायका अरोरा-खान : मलायका अरोरा-खान तर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी सतत फोटो टाकत असते. विशेष म्हणजे ती फोटो टाकताना आपले शारीरिक तंदुरुस्तीचे फोटो शेअर करीत असते. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीच्या रहस्यापैकी एक रहस्य म्हणजे योगा हे आहे असे मलायका सांगते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्येही मलायकाचे अनेक योग व अन्य व्यायामाचे फोटो चाहत्यांसाठी पर्वणीच असते. या काळातही ती नियमित फोटो शेअर करते. ती सांगते, की मी कितीही बिझी असली तरी  व्यायाम व योग कधीही चुकवीत नसते.

दीपिका पदुकोन म्हणते सुशांतच्या परफार्मन्समध्ये दम होता...

सुश्मिता सेन : सुश्मिता सेनही आपल्या शारीरिक फिटनेसचे रहस्य सांगताना सर्व काही योगामुळे आहे असे सांगते. तिचे योगाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती अधिक शारीरिक व्यायामापेक्षा योग करण्यावर अधिक भर देते. योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य तंदुरुस्त राहते असे सुश्मिताचे सांगणे आहे.

करिना कपूर : आजच्या शारीरिक तंदुरुस्त असलेल्या आघाडीच्या नायिकांची नावे घेतल्यास करिना कपूरचे नाव सर्वात आघाडीवर असेल. करिनाचे आपल्या शारीरिक फिटनेसकडे बारीक लक्ष असते. ती स्वतः योगा करीत असते. याशिवाय पती सैफ आणि अन्य कुटुंबियांनाही योगा करण्याविषयी आग्रह धरते.

मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...

दीपशिखा नागपाल : अभिनेत्री दीपशिखा नागपाल म्हणते की,  योग आमच्या सर्वाच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. योगाने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनात्मक फायदा होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाने आयुष्य आनंदी राहण्यास मदत होते. मला आता योगाची आवडच नसून आमच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. कुटुंबातील अनेकांना हळूहळू त्याचे महत्व समजते . निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित व्यायाम पाहिजे. त्या व्यायामाचाच एक भाग म्हणून योगाचे मोठे महत्व आहे. उत्तम आरोग्यासाठी मी योगला वेळ देते व सेटवरील अनेकांना योगाचे महत्व सांगते. योगा ही एक चळवळ बनली पाहिजे.

क्या बात है! 20 दिवसांच्या लढाईनंतर 'त्यांनी' केली कोरोनावर यशस्वी मात... 

श्रद्धा आर्य : 'कुंडली भाग्य' मधील श्रद्धा आर्य सांगते की योगाने माझे आयुष्यच बदलले आहे. मी प्राणायाम न चुकता करते. धावपळ रोजचीच असते. मात्र, श्वासोच्छवास आपल्या शरीराची मोठी अत्यावश्यक बाब आहे. आमच्या इंडस्ट्रीत व कामात मोठे ताणतणाव असतात आणि योग हे त्यावरील रामबाण औषध आहे. योगाचे विविध प्रकार असून त्या योगे शरीराच्या विविध भागांना आराम मिळू शकतो. पण त्यासाठी ते सर्व योगाचे प्रकार नियमितपणे करायला हवेत.

असित मोदी : "तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी सांगितले की, मानवी शरीरास आणि मनास आरोग्यदायी ठेवणाऱ्या ज्या बाबी आहेत  त्यात योग हा सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. संपूर्ण जगात भारतातील योग विद्या ही एक अत्यंत पुरातन विद्या असून जगभर या भारतीय विद्येचा प्रसार होत आहे, ही बाब भारतीय म्हणून सर्वाना अभिमानास्पद आहे. घरात बसूनच नियमित योग करा आणि शारीरिक तंदुरुस्त राहा. मागील वर्षी जुहूला याच दिवशी आम्ही पारंपरिक योग शिकविला होता व मोठ्या संख्येने लोकांनी सहभागही नोंदविला होता. मात्र आता या लॉकडाऊनच्या परिस्थितीत घरीच राहून योग करावा.

फादर्स डे स्पेशल : 'या' कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना...

रजनीश दुग्गल : अभिनेता रजनीश दुग्गलही योगाच्या प्रेमात असून केवळ रजनीशच नाही तर त्याची दहा वर्षांची लाडकी मुलगी टीया हीसुद्धा नियमित योग करते. रजनीश आपल्या मुलीसोबत हसत-खेळत योग करतो. मुलांना योगाची आवड व सवय लागावी यासाठी तो मुलांचा मूड लक्षात घेऊन सोपे व करण्यास साधे असे योगाचे प्रकार टीया शिकवितो. रजनीशने जागतिक योगा दिवसाच्या निमित्ताने टीयासोबत योगा
करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

loading image