
Pushpa 2: मनोज वाजपेयीनं पुष्पाच्या अल्लु अर्जुनला ऐकवलं, 'भाऊ मी नेहमीच...'
Pushpa 2 movie News: साऊथच्या अल्लु अर्जुनच्या पुष्पान कमाल केली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉलीवूडच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांची झोप उडवली होती. अनेकांना पुष्पानं धडकी भरली होती. त्याचा प्रभाव (bollywood actor manoj bajpayee) एवढा होता की, बॉलीवूडच्या इतर कोणत्याही फिल्मस त्यावेळी प्रदर्शित झाल्या नाहीत. ज्या झाल्या त्या भुईसपाट झाल्या. पुष्पा (pushpa 2 movie) 2 नं तीनशे कोटींपेक्षा अधिक बिझनेस केला. त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून पुष्पाचं नाव झालं. यासगळ्यात पुष्पाच्या पुढील भागाची चर्चा सुरु झाली आहे.
अल्लु अर्जुनच्या ब्लॉकबस्टर अशा पुष्पाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या (allu arjun news) भेटीला येणार आहे. सुकुमारनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे कामकाज पूर्ण होत आले आहे. मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लु अर्जुनच्या या चित्रपटाचा सिक्वेल कधी येतोय असा प्रश्न नेटकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा विचारला आहे. सुत्रांनी असं सांगितलं होतं की, अल्लु अर्जुनच्या पुष्पा द रुलमध्ये मनोज वाजपेयी पोलिसाची भूमिका करणार आहे.
मनोज वाजपेयीला आपल्या नावावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत असे कळल्यानंतर मात्र धक्काच बसला. त्यानं लागलीच त्यावरुन चाहत्यांना उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास काही ठेऊ नका. त्यानं मीडियालाच खडसावले आहे. तो म्हणतो, कुठून घेऊन येता अशा बातम्या.. मी यापूर्वी देखील साऊथच्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे चांगल्या कथांच्या शोधात मी असतो. मला बॉक्स ऑफिसची काही चिंता नसते. शोध सुरु असतो तो चांगल्या कथेचा. ती जर चांगली असेल तर मात्र मग आवडीनं भूमिका करायला प्राधान्य देतो.
हेही वाचा: The Family Man 2: निर्मात्यांची मोठी घोषणा, नेटफ्लिक्सबरोबर सीरिज
जे कोणी नेहमीच बॉक्स ऑफिसची चर्चा करतात त्यांना सांगायचे आहे की, भाऊ, मी नेहमीच बॉक्स ऑफिसच्या ट्रेंडच्या विरोधात लढलो आहे. कोणत्या चित्रपटानं तीनशे, पाचशे किंवा हजार कोटींची कमाई केली ते माझ्या लेखी फारसे महत्वाचे नाही. असं म्हटलं जातं आहे की, अल्लु अर्जुनचा पुष्पा 2 हा ऑगस्टपर्यत फ्लोअरवर येणार असून 2023 च्या मध्यावर ती फिल्म प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: Ranbir Kapoor: 'हार्ली डेव्हिडसन' मला मिळाली, ओरडा संजुनं खाल्ला!
Web Title: Manoj Bajpayee Comment On Tollywood Superstar Allu Arjun Pushpa 2 Movie Police Role
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..