esakal | 'मुलं मोठी झाली की नाव कमवतात, पण माझ्या तीन वर्षाच्या अन्वीनं...
sakal

बोलून बातमी शोधा

'मुलं मोठी झाली की नाव कमवतात, पण माझ्या तीन वर्षाच्या अन्वीनं...

'मुलं मोठी झाली की नाव कमवतात, पण माझ्या तीन वर्षाच्या अन्वीनं...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिद्ध मराठी अभिनेता अंशुमन विचारे (anshuman vichare) यांची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या व्हिडिओला भारतीय सैनिकांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्याचा उल्लेख त्यांनी त्यात केला आहे. त्याला सध्या सोशल मीड़ियातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अन्वीनं जी कामगिरी केली आहे. त्याचा गौरव भारतीय सैनिकांनी केली आहे. अशा आशयाची एक पोस्ट अंशुमन यांनी लिहिली आहे. त्याला त्यांच्या चाहत्यांकडून वेगवेगळ्या कमेंटही मिळाल्या आहेत. अन्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर असून तो भारतीय जवावांनी पाहिला. आणि त्याचं कौतूक त्यांनी केलं आहे.

त्या व्हिडिओमध्ये अंशुमन म्हणतात. आतापर्यतची माझ्यादृष्टीनं ही एक मोठी कमेंट आहे. याचं कारण म्हणजे अन्वी च्या एका video वर भारतीय जवानांकडून कमेंट आली आहे. ती वाचून ऊर भरून आला. मुलं मोठीं झाली की आई वडिलांचं नाव मोठं करतात. पण माझ्या 3 वर्षांच्या बाळानं आताच ते सुखं अनुभवायला दिलंय , तिच्यावर इतकं प्रेम करण्यासाठी आणि तिला इतके आशीर्वाद देण्यासाठी मी आणि तिची आई तुम्हां सगळ्यांचे खुप खुप आभार मानतो. अंशुमन यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

तन्वी बाळा तुला आम्ही भारतीय सीमेवरील जवान पाहत असतो. तू खूप छान आणि गुणी बाळ आहेस. अशीच हसत खेळत राहा, काळजी घे, जयहिंद अशा शब्दांत जवानांनी अन्वीचं कौतूक केलं आहे. त्यावर अंशुमन यांनी पोस्ट लिहिली आहे. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावर चाहत्यांनीही अन्वीचं कौतूक केलं आहे. भारतीय जवानांनी दिलेल्या या कमेंटवर अंशुमन यांनी पुन्हा त्यावर दुसरी कमेंट केली आहे. त्यात ते म्हणतात, आपली कमेंट वाचून आनंद झाला. आमच्या कुटूंबियांच्या भावना मी शब्दांत नाही व्यक्त करु शकत. त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो.

हेही वाचा: सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

loading image
go to top