esakal | अकरा महिन्यांच्या मुलाच्या उपचारासाठी मराठी कलाकार मागतोय मदत; वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

atul virkar.

'माझ्या नवऱ्याची बायको', 'लव्ह लग्न लोच्या', 'तू माझा सांगाती' अशा काही मराठी मालिकांबरोबरच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अशा काही हिंदी मालिकामध्ये तसेच चित्रपटामध्ये अतुलने काम केले आहे. परंतु गेले चार महिने हाताला काहीच काम नसल्यामुळे तो आर्थिक समस्येत सापडला आहे.

अकरा महिन्यांच्या मुलाच्या उपचारासाठी मराठी कलाकार मागतोय मदत; वाचा सविस्तर...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : कोरोनामुळे गेले तीन-साडेतीन महिने चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अनेकांची रोजीरोटी बुडालेली आहे तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. पडद्यामागील कित्येक कामगार आणि छोटी-मोठी कामे करणारे कलाकार सध्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. आता हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये काम करणारा कलाकार अतुल विरकर याला आपल्या अकरा महिन्यांच्या मुलाच्या उपचारावरील खर्चासाठी खूपच वणवण करावी लागत आहे. 

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...

चित्रपटसृष्टीत काम करीत असतानाच तो पौराहित्याचाही व्यवसायही करतो. अनेक कलाकारांच्या घरी गणपतीला पौरोहित्यासाठी जातो. मात्र लॉकडाऊनमुळे पौराहित्याबरोबर चित्रीकरणही ठप्प झाले. त्यामुळे आता मुलाच्या पुढील उपचाराकरिता पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'लव्ह लग्न लोच्या', 'तू माझा सांगाती' अशा काही मराठी मालिकांबरोबरच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अशा काही हिंदी मालिकामध्ये तसेच चित्रपटामध्ये अतुलने काम केले आहे. परंतु गेले चार महिने हाताला काहीच काम नसल्यामुळे तो आर्थिक समस्येत सापडला आहे. 

मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये

अतुल राहायला ठाण्यातील वर्तकनगर येथे आहे आणि त्याला अकरा महिन्यांचा मुलगा आहे. त्याचे नाव प्रियांश. तो एक महिन्याचा असताना  त्याला फीट आली आणि तेव्हापासूनच त्याच्या शरीरावरचा बॅलन्स राहात नाही. त्याचे वजन खूप कमी आहे आणि त्याला डेव्हलपमेट डिले डिसऑर्डर आहे. फेब्रुवारी महिन्यापासून त्याच्यावर हिंदुजा रुग्णालयात डॉ. अभिषेक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचाराचा खर्च दोन ते अडीच लाख रुपये झाला आहे. मात्र, पुढील उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. रोजगार पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येत नाही आणि मुलाच्या उपचारासाठी नेमके काय करायचे अशा द्विधा अवस्थेत तो सापडला आहे. 

मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी, पारनेरच्या 'त्या' पाच नगरसेवकांची घरवापसी...

याबाबत अतुल म्हणाला, की माझ्या मुलाला जन्मापासूनच मान पकडता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जमविलेली सगळी पुंजी त्याच्यावर खर्च केली आहे आणि आता उपचारासाठी काय करावे... कुठून पैसे आणावेत या विवंचनेत मी आहे. सध्या कोरोनामुळे अंधेरी येथील एका क्लीनिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. त्याकरिता काही लाख रुपयांचा खर्च आहे. कुणी मदत केली तर तुमची ही मदत माझ्या मुलाला या आजारातून मुक्त होण्यास खूप उपयोगी ठरेल. खालील बँक खात्यावर तुम्ही मदत पाठवू शकता.
--
अतुल अशोक विरकर
स्टेट बँक ऑफ इंडिया 
शाखा - समतानगर, ठाणे (पश्चिम)
खाते क्रं - 11252479538
आयएफएससी - SBIN0013035
गुगल पे - 9967380241
मोबाईल क्रमांक - 9867935255    

loading image