Swara Bhaskar says,Always wanted a family and children! स्वरानं एका कार्यक्रमात नुकतच जाहीर केलंय की मला नेहमीच मुलं हवी होती आणि आता ती वेळ आली आहे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhaskar

स्वरा भास्कर लवकरच होणार आई....

sakal_logo
By
प्रणाली मोरे

स्वरा भास्कर म्हणजे नेहमीच आपल्या बेधडक स्वभातून केलेल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री. अर्थात तिने उधळलेल्या मुक्ताफळांमुळे नेहमीच तिला नेटक-यांच्या ट्रोलींगचा सामना करावा लागलाय. पण आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे तिच्याबद्दल मतप्रदर्शन करण्यास सुरूवात झाली आहे. स्वरानं एका कार्यक्रमात नुकतच जाहीर केलंय की, "मला नेहमीच फॅमिली हवी होती,मुलं हवी होती. आणि आता ती वेळ आली आहे. मी लवकरच आई होणार आहे,माझी फॅमिली असेल." पण तिच्या या वक्तव्यावरून तिच्याबद्दल वाईट बोलायचं सोडून चांगली मतं सगळ्याच स्तरातून व्यक्त होतायत.

हेही वाचा: करण जोहरचा डायटेशियन आहे बॉलीवूडचा 'हा' सुपरस्टार

स्वरा आई होणार आहे खरी पण एका दत्तक घेतलेल्या मुलाची. तिने त्यासाठी रीतसर रजिस्ट्रेशन केलं असून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. असंही ती म्हणाली. "मी भाग्यवान आहे की मी भारतात राहते. कारण आपल्या देशात अविवाहीत स्त्रीला मुल दत्तक दिले जाते. कारण काही देशात मुल दत्तक घेण्यासाठी लग्न करावे लागते. दत्तक घेण्यापूर्वी आपण खूप रीसर्च केल्याचं ती म्हणते. अनेक अनाथालयांना भेटी दिल्या आहेत,अनेक दत्तक घेतलेल्या मुलांच्या पालकांना भेटली आहे,दत्तक मुलांचीही भेट घेतली आहे. मला त्या प्रत्येकाचा अनुभव जाणून घ्यायचा होता म्हणजे माझा पुढचा प्रवासही सोपा होण्यास मदत होईस असंही तिनं नमूद केलं. दत्तक प्रकियेचा कालावधी खूप मोठा असतो. मला आई होण्यासाठी खूप वाट यामुळे पहावी लागतेय,तीन वर्ष झाली आता. पण या संपूर्ण प्रवासात मला माझ्या आई-वडीलांची साथ लाभली हे विशेष."

हेही वाचा: ऐश्वर्याने आराध्याला टोकले आणि म्हणाली,"शिस्तीत चाल"

स्वरा भास्कार आता एका 'शिर कुर्मा' या लघुपटात दिसणार आहे. समलिंगी लव्ह लाइफ कथानकावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात तिच्यासोबत दिव्या दत्ता,शबाना आझमीही मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन फराझ अरिफ अन्सारी यानं केलंय. लंडनमधील एका फिल्म फेस्टीवलमध्ये 'शिर कुर्मा' सिनेमा पाठवण्यात आला होता. आणि तिथे आपल्याला या सिनेमासाठी 'सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाल्याचं तिनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलंय. शबाना आझमी आणि दिव्या दत्ताचे तिने यासाठी धन्यवाद व्यक्त केले आहे. या दोघींच्या सपोर्ट आणि मार्गदर्शनामुळे आपल्याला हा सन्मान मिळू शकला असं ती म्हणाली.

loading image
go to top