''माझं अडलं..की हाच असतो सोडवायला..'', संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष Sankarshan Karhade post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Actor Sankarshan Karhade Birthday post for his younger brother

Marathi Actor: ''माझं अडलं..की हाच असतो सोडवायला..'', संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Marathi Actor:अभिनेता संकर्ष कऱ्हाडे गेली अनेक वर्ष नाटक,टी.व्ही आणि सिनेमा अशा अनेक माध्यमातून सक्रिय पहायला मिळतो. अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर संकर्षणला उत्कृष्ट लेखक,कवी,अभिनेता अशी ओळख इंडस्ट्रीत मिळाली आहे. सध्या तो झी मराठी वाहिनी वरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत समीर ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

या भूमिकेमुळे सध्या तो घराघरात चर्चेत आहे. इतकंच नाही तर याच वाहिनीवर प्रशांत दामलेंसोबत त्याची खवय्येगिरी देखील पुन्हा सुरू झाली आहे. अर्थात तो अभिनेता म्हणून जितका लोकांना भावतो त्याहून अधिक तो आपल्या खुसखुशीत निवेदनानं लोकांच्या मनावर राज्य करतो. आता तो पुन्हा चर्चेत आहे त्याच्या एका नव्या पोस्टमुळे. (Marathi Actor Sankarshan Karhade Birthday post for his younger brother)

हेही वाचा: Cirkus Poster: तिरळ्या डोळ्यांचा रणवीर गेला भाव खाऊन; 'सर्कस' च्या मोशन पोस्टरचा मोठा धमाका...

संकर्षण सोशल मीडियावर भलताच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांत तर त्याच्या पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत आलेला दिसला. त्यानं मागे त्याच्या जुळ्या मुलांचे फोटो पोस्ट केले होते त्याला काही तासातंच लाखो व्ह्यूज मिळाले होते. तर त्याची देवासंदर्भातील एक पोस्टही लोकांनी उचलून धरली होती.

आता त्यानं पोस्ट करताना एक फोटो शेअर केलाय. आणि त्याच्यासोबत त्यानं जी नोट लिहिलीय ती जास्त चर्चेत आलीय. आता ही पोस्ट आहे संकर्षणच्या भावाविषयीची. संकर्षणनं आपल्या लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दोन भावांमधील घट्ट नात्याचा पट खूप सुंदर शब्दात उलगडला आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

संकर्षण कऱ्हाडेनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,अधोक्षज.. Happy Birthday

माझा छोटा भाऊ.. माझ्यात जे नाही ते सगळं ह्याच्यात आहे..

नियमितता , सातत्य , व्यायाम करणे , खाण्याचे नियम पाळणे ..

माझं अडलं .. कि हाच असतो सोडवायला ..

हसत रहा.. काम करत राहा .. खूप यशस्वि हो ..

वाढदिवसाच्या खूपच शुभेच्छा ..

आजकाल दोन भावांमधील हे घट्ट नातं तसं फार कमी पहायला मिळतं. त्यात मोठ्या भावानं म्हणणं की लहान भावाशिवाय माझं अडतं हे तर अभावानेच दिसतं. आणि म्हणूनच संकर्षणनं केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे.