सिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा

सिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा

मुंबई - मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह मराठमोळ्या पद्धतीनं पार पडला. पुण्यात झालेल्या या विवाहसोहळ्याला अभिज्ञा भावे, इशा केसकर,उमेश कामत , पूजा सामंत, भूषण प्रधान या या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मेहंदी ,संगीत आणि लग्न सोहळ्याचे फोटो सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते. 

रिसेप्शनमध्ये रॉयल लूकमध्ये  मिताली आणि सिद्धार्थ रूबाबदार दिसत होते. मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या विधीतील प्रत्येक कार्यक्रम चर्चेत होता. लग्नानंतर देवाचे जागरण गोंधळ घालण्याची प्रथा असते. मिताली आणि सिद्धार्थने देखील जागरण गोंधळाची पूजा केली आहे. या जागरण गोंधळाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. जागरण गोंधळाच्या पूजेसाठी मिताली हिरवी साडी तर सिद्धार्थने कुर्ता आणि पायजमा आसा पारंपरिक पोशाख केला  होता. मिताली आणि सिद्धार्थने कपाळाला देवाचा भंडारा लावून जागरण गोंधळाची पूजा केली.   

मिताली आणि सिद्धार्थच्या या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हजेरी लावली होती. कामामुळे सोनाली मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाला येऊ शकली नव्हती त्यामुळे जागरण गोंधळाला येऊन तिने दोघांना शुभेच्छा दिल्या. सोनाली पुण्यात नव्हती पण सिद्धार्थ आणि मितालीला भेटण्यासाठी तिने धावत पळत पुणे गाठलं. सोनालीनं सिद्धार्थ आणि मिताली सोबत फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. 'गोंधळात गोंधळ झाला पार सॅारी लग्नाला येऊ नाही शकले. तरीही धावत-पळत आले, सगळ उरकण्याच्या आत पोहचले'असे कॅप्शन सोनालीनं या फोटोला दिले. सिद्धार्थने मितालीला उचलून जागरण गोंधळाच्या पूजेच्या फेऱ्या मारतानाचा व्हिडीओ सोशल  मिडीयावर व्हायरल होत आहे. या नव विवाहीत जोडीला सोशल मिडीयावरून सगळे शुभेच्छा देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com