Apurva Nemlekar: बिग बॉस गाजवल्यानंतर अपूर्वाच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा

अपूर्वा नेमळेकरच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Apurva Nemlekar: बिग बॉस गाजवल्यानंतर अपूर्वाच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा
Apurva Nemlekar: बिग बॉस गाजवल्यानंतर अपूर्वाच्या नवीन प्रोजेक्टची घोषणाSAKAL

बिग बॉस मराठी ४चा सीजन संपला असला तरी या शोची चर्चा काही संपत नाहीय. या शोची उपविजेती अपूर्वा नेमळेकर हिची शो संपल्यावर सुद्धा चर्चा आहे. 100 दिवस या अपूर्वाच्या आवाज घरात घुमत होता. अपूर्वा नेमळेकरच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अपूर्वाचा बिग बॉस नंतर एक प्रोजेक्ट भेटीला येतोय. द डिलिव्हरी बॉय असं या प्रोजेक्टचं नाव आहे.

Apurva Nemlekar: बिग बॉस गाजवल्यानंतर अपूर्वाच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा
Apurva Nemlekar: 'वरूण तू मला एका गोष्टीचं आश्वासन दिलं होतं.. ; अपूर्वाची पोस्ट अन् चर्चेला उधाण

अपूर्वाने सोशल मीडियावर द डिलिव्हरी बॉय या तिच्या प्रोजेक्टचं पोस्टर शेयर केलंय. द डिलिव्हरी बॉय हि एक शॉर्ट फिल्म असून स्वयंभू स्टुडिओजने या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. बिग बॉसमध्ये जाण्याआधी म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये अपूर्वाने या शॉर्ट फिल्मचं शूटिंग केलेलं. आता काहीच दिवसात हि शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अपूर्वाने बिग बॉस मराठी ४ चं उपविजेतेपद पटकावलं. अपूर्वाला फायनलसाठी प्रचंड फॅन फॉलोइंग होतं. अक्षय केळकर ने बिग बॉस मराठी ४ चं विजेतेपद पटकावलं. अपूर्वाचा खेळ, तिची स्पष्ट, रोखठोक वागणूक पाहून अपूर्वाच विजेती होणार असे सर्वांना वाटले होते, पण तसे झाले नाही. बिग बॉस संपल्यावर सुद्धा अपूर्वाला प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

Apurva Nemlekar: बिग बॉस गाजवल्यानंतर अपूर्वाच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा
Bigg Boss 16: शिव ला पुन्हा धक्का! साजिद घराबाहेर...घरातले नाराज मात्र नेटकरी जोमात

अपूर्वाने इ सकाळला दिलेल्या मुलाखतीत महेश सरांनी तिचं कौतुक केलं असा खुलासा केला. अपूर्वा म्हणाली 'मांजरेकरांनी माझं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, तु ज्या पद्धतीने खेळली ते सर्व मी पाहिलं आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी जे पाहायचं ते नक्कीच तुझ्यात हेरलं आहे. त्यामुळे लवकरच आपण एकत्र सिनेमा करूया', असं महेश सर अपूर्वाला म्हणाले आणि तिला आनंद झाला.

बिग बॉस मराठी ४ गाजवल्यावर अपूर्वाची हि शॉर्ट फिल्म बघण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक आहेत. याशिवाय अपूर्वा 'रावरंभा' या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमिताने अपूर्वा पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्तिरेखा साकारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com