Ketaki Chitale: सावरकरांकडून तुम्ही काय शिकलात? केतकी चितळेने विचारला सर्वांना सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

veer sawarkar, ketaki chitale, ketaki chitale news, swatantryaveer sawarkar birth anniversary

Ketaki Chitale: सावरकरांकडून तुम्ही काय शिकलात? केतकी चितळेने विचारला सर्वांना सवाल

Ketaki Chitale on Veer Sawarkar News Post Viral: आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान कधीही न विसरता येण्यासारखं. अशातच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पोस्ट केलीय. केतकीने तिच्या तुरुंगातले दिवस आठवून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पोस्ट लिहिली आहे.

(marathi actress ketaki chitale viral post on swatantryaveer sawarkar birth anniversary)

केतकी लिहिते.. “जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही रचणे ही कल्पना मला गेल्या वर्षांपर्यंत झेपत नव्हती. पाठांतराने हे शक्य आहे हे कळायचे, पण कधी गरजच पडली नव्हती.

गेल्यावर्षी जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा फक्त सावरकरांना डोळ्यासमोर ठेवून रोज पाठांतर करीत वही-पेन मिळेपर्यंत बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या. त्यांच्याकडून ही गोष्ट ही शिकायला मिळेल हे कधीच वाटले नव्हते”, अशी पोस्ट केतकी चितळेने केली आहे."

याशिवाय केतकी चितळे पुढे लिहिते.. आजकाल ट्रेण्ड झाला आहे की सावरकरांचा फोटो DP म्हणून ठेवायचा. पण किती जणांनी त्यांचे लिखाण वाचले ? किती जण त्यांच्याकडून काहीतरी शिकले आहेत? अशाप्रकारे केतकी चितळेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट करून लोकांना सवाल विचारले आहेत. केतकी चितळेच्या या पोस्टवर अनेकांनी तिला सपोर्ट केलाय तर अनेकांनी तिच्यावर टीकाही केलीय.

केतकी चितळे ही सोशल मीडियावर कायम चर्चेत. केतकीला आपण आजवर मालिकांमधून पाहिले आहे.

केतकी चितळे काही दिवसांपुर्वी एका नवीन कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत आलीय. केतकी चितळेचं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मोठा परिणाम झाला होता.

त्यामुळे केतकी चितळेचा तीळपापड झालाय. केतकी चितळेने सोशल मिडीयावर तिचा संताप व्यक्त केला होता.

टॅग्स :Marathi Actress