esakal | विधान परिषदेसाठी चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने केले मराठी चित्रपटसृष्टीबाबत मोठे विधान...
sakal

बोलून बातमी शोधा

dipali sayyed

सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे आता हा मुद्दा चर्चिला गेला असला तरी कित्येक होतकरू आणि टॅलेंटेड कलाकारांना याचा फटका बसलेला आहे. आता तरी इंडस्ट्री शहाणी होईल आणि टॅलेंटेड कलाकारांना योग्य न्याय देईल.

विधान परिषदेसाठी चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने केले मराठी चित्रपटसृष्टीबाबत मोठे विधान...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : नेपोटिझम हे हिंदी चित्रपटसृष्टीतच आहे ,असे काही नाही तर ते मराठी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आहे. मात्र तुम्ही त्याचा कसा सामना करता हे महत्त्वाचे आहे. त्याकरिता तुमचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे आता हा मुद्दा चर्चिला गेला असला तरी कित्येक होतकरू आणि टॅलेंटेड कलाकारांना याचा फटका बसलेला आहे. आता तरी इंडस्ट्री शहाणी होईल आणि टॅलेंटेड कलाकारांना योग्य न्याय देईल, अशा प्रकारचे उद्गार काढले आहेत अभिनेत्री दीपाली सय्यदने.

बापरे! विक्रोळीत कन्नमवारनगर बेस्ट चौकीत शिरले पाणी; वाहक - चालकांचे होतायत हाल.. 

सन 2019 ची विधानसभा निवडणूक दीपालीने शिवसेनेच्या तिकिटावर लढविली होती आणि त्यामध्ये तिचा पराभव झाला होता. आता विधान परिषदेच्या जागेसाठी दीपालीच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. त्याबाबत तिच्याशी संपर्क साधला असता तिने या मुद्दय़ावर अधिक काही बोलणे टाळले. ती म्हणाली, की आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मला आमदारकी मिळो अथवा न मिळो. मी माझे काम करीतच राहणार आहे. 

पिवळ्या बेडकांची वसईत डराव डराव; लॉकडाऊनमध्येही भरली अनोखी शाळा...

आता लॉकडाऊनमध्येही मी माझे लोकांना मदत करण्याचे काम सुरू ठेवले आहे. अपंग कलाकारांना मदत केली आहे. तमाशा कलावंतांनाही मदत केली आहे. आपण आपले काम करीत राहायचे. त्याचे फळ आपल्याला आज किंवा उद्या मिळतेच. काम करायचे ते प्रामाणिकपणे आणि चोख करायचे.

मुंबईतील नागरी समस्येवर व्यक्त होणारी पत्रचळवळ अखेर थांबली...

सुशांत सिंह राजपूतचे निधन ही धक्कादायक बाब आहे. त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करतीलच. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा अशी अपेक्षा आहे. परंतु हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही नेपोटिझम आणि कंपू शाही आहे. काही मंडळी एका ठराविक ग्रुपबरोबर काम करतात. त्यामुळे अन्य कुणाला तेथे वाव मिळत नाही. सुशांतच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीनेही धडा घेण्याची आवश्यकता आहे, असेही दीपाली म्हणाली.