esakal | लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय! राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय! राज्यासह परदेशात चित्रीकरण सुरू

टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे चित्रीकरण सुरू असून, अनेक कलाकार या चित्रीकरणात सहभागी झाले आहेत. इतकेच नाही तर मुंबई-महाराष्ट्राबरोबरच परदेशातही मराठी चित्रपटांच्या चित्रीकरण सुरु झाले आहे. लंडन येथे सध्या तीन चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे.

लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय! राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे चित्रीकरण सुरू असून, अनेक कलाकार या चित्रीकरणात सहभागी झाले आहेत. इतकेच नाही तर मुंबई-महाराष्ट्राबरोबरच परदेशातही मराठी चित्रपटांच्या चित्रीकरण सुरु झाले आहे. लंडन येथे सध्या तीन चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. कोरोनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत काहीसे निराशेचे वातावरण आलेले असताना आता मोठ्या उत्साहात आणि अधिक जोमाने चित्रीकरणाचे काम सुरू झाले आहेत. पुढील वर्षी यातील बहुतेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

'' 'मिस वर्ल्ड' झालीये याचा आनंदच,पण तुझ्या अभ्यासाचे काय'' ?

दिग्दर्शक प्रसाद ओक आणि निर्माता अक्षय बर्दापूरकरच्या चंद्रमुखी या चित्रपटाचे चित्रीकरण वेगाने सुरू झाले आहे. तसेच भारत माझा देश आहे, इलू-इलू या मराठी चित्रपटाचेही चित्रीकरण विविध ठिकाणी सुरू आहे. राज्यातील विविध ठिकाणी हे चित्रीकरण सुरू आहे. तर गजेंद्र अहिरेच्या श्रीमती अब्रेला या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे सुरू आहे. मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी यांनी या चित्रीकरणात भाग घेतला आहे. याशिवाय नितीन प्रकाश वैद्यच्या छुमंतर आणि दुसऱ्या एका नाव न ठरलेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही लंडनला सुरू झाले आहे. या चित्रीकरणात प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू आणि सुव्रत जोशी हे कलाकार सहभागी झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करीत आहेत. विशेष म्हणजे सैराट फेम रिंकू राजगुरूचा हा पहिलाच परदेश दौरा असल्याने ती या दौऱ्याचा चांगलाच आनंद घेत आहे. 

हृतिक - सुझानचे होणार 'पॅच अप' ?

यापूर्वी लंडनला चित्रीकरण केले आहे. सध्या कोरोनामुळे परिस्थिती खूप बिकट आहे. चित्रीकरण कोठे करायचे असा विचार मनात घोळत होता. साहजिकच लंडनला करायचे नक्की झाले. सर्व परवानगी पहिल्यांदा घेतली आणि त्यानंतरच चित्रीकरणाला आलो. संपूर्ण समुहाची दोन ते तीन वेळा कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर चित्रीकरणास परवानगी मिळाली. आता सर्व जण लंडनला आहोत. दोन चित्रपटांचे चित्रिकरण येथे होत आहे. 
- नितीन प्रकाश वैद्य, निर्माता. 

आमचा समूह चित्रीकरणासाठी लंडनला आलेला आहे. श्रीमती अम्ब्रेला असे आमच्या मराठी चित्रपटाचे नाव आहे. 
- गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक. 

---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)