Teaser: माझ्यासाठी तूच सोनं, हिरे-मोती अन् धनदौलत! 'मजनू'|Marathi Movie Majnu Teaser Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

majnu movie

Teaser: माझ्यासाठी तूच सोनं, हिरे-मोती अन् धनदौलत! 'मजनू'

Marathi Movie- मराठी मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे आणि विषयांचे चित्रपट येत आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून येत आहे. (Marathi Entertainment News) गेल्या दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या मराठी मनोरंजन विश्वानं आता चांगलाच वेग पकडला आहे. त्याचा परिणाम बॉक्स (Box Office) ऑफिसवरील कमाईनं दिसून आला आहे. नव्या दमाचे लेखक आणि दिग्दर्शकही समोर येत आहेत. त्यामध्ये दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या (Majnu Movie) नावाचा उल्लेख करावा लागेल. सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित 'मजनू' चित्रपटाचा टीझर सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हा ट्रॅफिक डीसीपी राहुल श्रीरामे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला निर्माते गोवर्धन दोलताडे, भारत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे-सानप यांच्यासह दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, चित्रपटातील कलाकार सुरेश विश्वकर्मा, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे व तंत्रज्ञ उपस्थित होते.

टीझरमध्ये रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत आहेत. "माझ्यासाठी तूच सोनं, नाणं, हिरे, मोती, धन दौलत ..." अशा संवादाने सुरु होणाऱ्या या टीझरमुळे "मजनू" हा चित्रपट एक तरल प्रेमकहाणी असेल असे स्पष्ट होत असले तरी नितीश चव्हाण, सुरेश विश्वकर्मा व सहकलाकार यांच्या भूमिकेमुळे या प्रेमकहाणीत कोणते ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट बघावी लागणार आहे. 'मजनू' बद्दल बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, "शाळा संपवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्या नंतर तेथील बंधमुक्त आणि मौजमजेच्या वातावरणात वावरताना प्रत्येक युवक हा स्वतःला मजनू समजू लागतो मग ते शहर असो की गाव. प्रेमाची खरी ओळख सर्व तरुण, तरुणींना याच काळात होते, त्यांच्या या भावविश्वावर आधारित 'मजनू' हा चित्रपट फक्त प्रेमकहाणी नसून एक परिपूर्ण पॅकेज आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

'मजनू' मध्ये प्रेम, संघर्ष, सस्पेन्स, विरह यांसारखे अजूनही विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत, तसेच चित्रपटातील गाणी श्रवणीय असून ती प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच भुरळ घालतील." 'मजनू' चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे, भारत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे-सानप असून कथा, पटकथा आणि संवाद गोवर्धन दोलताडे यांचे आहे. चित्रपटात नितीश चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'मजनू' चित्रपटाला संगीतकार पी. शंकरम, सचिन अवघडे, साजन - विशाल यांचे संगीत लाभले आहे तर गीतकार दीपक गायकवाड आणि गोवर्धन दोलताडे यांच्या गीतांना इंडियन आयडॉल फेम सलमान अली, आदर्श शिंदे, संदीप उबाळे, बेला शेंडे, आनंदी जोशी व विशाल चव्हाण यांचा स्वरसाज लाभला आहे.

हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?

Web Title: Marathi Movie Majnu Teaser Viral Social Media Director Shivaji Doltade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top