'वशा कारकूनी सोडून गायला सुरुवात कर!', 'मी वसंतराव'चा Trailer|Marathi Movie Mi Vasantrao Tralier | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mi vasantrao

'मी वसंतराव'चा Trailer: 'वशा कारकूनी सोडून गायला सुरुवात कर!'

Marathi Movie: बहुचर्चित अशा मी वसंतराव या चित्रपटाचा ट्रेलर (Me Vasantrao Movie trailer) आता सोशल मीडियावर व्हायरल झाला (Social media news) आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत 'मी वसंतराव' हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुमचं घराणं कोणतं, या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वताःला त्यांच्या गायकीतून सिद्ध केलं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या ट्रेलरनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ख्यातनाम शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी वसंतराव देशपांडे यांची मुख्य भूमिका चित्रपटामध्ये साकारली आहे.

पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, त्यांच्या सांगितिक प्रवासाविषयी कमी माहिती आहे. आणि नेमका हाच प्रवास 'मी वसंतराव' या चित्रपटाद्वारे मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.वसंतरावांची गोष्ट म्हणजे अक्षरशः अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.

'मी वसंतराव' या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा नुकताच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, राहुल देशपांडे, अनिता दाते, सारंग साठ्ये, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांच्यासह सुबोध भावे, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी आदी कलाकार उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते आणि प्रमुख पाहुणे नाना पाटेकर 'मी वसंतराव'च्या ट्रेलर लाँच निमित्ताने म्हणाले, '' पु. ल. देशपांडे म्हणायचे, मोठी माणसं जात नसतात. ती संगीत रूपानं चिरंतन राहतात. हे वाक्य वसंतरावांच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसनसात भिनलेली होती. त्यांचा साहित्याचा अभ्यासही अफाट होता. मी वसंतरावांना भेटलो आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानं एक व्यक्ती म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले. 'मी वसंतराव'बद्दल बोलायचं तर हा चित्रपट मी पाहिला आहे आणि तो इतका अप्रतिम आहे की, अनेकदा मी हा चित्रपट पाहू शकतो.

हेही वाचा: The Kashmir Files: बत्तीस वर्षांपासून दाटलेल्या हुंदक्याला वाट मिळाली

'मी वसंतराव'च्या प्रवासाबद्दल राहुल देशपांडे म्हणतात, ''आपण स्वतःचा जितका चहुबाजूनं शोध घेऊ, तितकं आपण समृद्ध होतो. याचा अनुभव मला 'मी वसंतराव' करताना आला. या प्रवासात एक कलाकार आणि मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी वृद्धिंगत झालो. आजोबा आणि त्यांची गायकी हा माझ्यासाठी मुळात जिव्हाळ्याचा विषय. मला आजोबांचा सहवास जास्त लाभला नाही. मात्र आजीकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींकडून मला त्यांना समजून घेता आलं. त्यांची गाणी ऐकली, रेकॉर्डिंग्स पाहिले. त्यातील बारकावे, हावभाव याचा मी अभ्यास केला. वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आजोबांमधील बदल माझ्यात उतरवणं माझ्यासाठी तसं आव्हानात्मक होतं. मला शारीरिक मेहनतही तितकीच घ्यावी लागली. कुठेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का पोहोचू नये, याची माझ्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम पुरेपूर काळजी घेत होतो. 'मी वसंतराव' म्हणजे त्यांच्या जीवनकार्याला वाहिलेली आदरांजली आहे.''

हेही वाचा: The Kashmir Files: चित्रपट करमुक्त करण्याची आ. नितेश राणेंची मागणी