'तो भावनाशून्य माणूस आहे..', अपूर्वाचा निशाणा नेमका कोणावर?Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Reality Show: Bigg Boss Marathi 4- Apurva, vikas, Amruta Deshmukh discussion and comment on prasad

Bigg Boss Marathi 4: 'तो भावनाशून्य माणूस आहे..', अपूर्वाचा निशाणा नेमका कोणावर?

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात आज अक्षय, अमृता देशमुख आणि अपूर्वा चर्चा करताना दिसणार आहेत. या चर्चेत ते एकदंरीतच प्रसादच्या स्वभावाबद्दल बोलताना दिसणार आहेत. (Marathi Reality Show: Bigg Boss Marathi 4- Apurva, vikas, Amruta Deshmukh discussion and comment on prasad)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: 'आता वैयक्तिक खेळ सुरु झाला...',तेजस्विनीला असं का म्हणाले किरण माने?

अक्षयचे म्हणणे आहे, ''सगळे खोटे चेहरे समोर येणार आहेत नंतर. म्हणून तर मागच्या वेळेस म्हटलं ना इमोशन्स घेऊन फिरत असतो फक्त काही झालं कि रडायचं. गेम मध्ये काही सुधारणा नाही. ते खोटं वाटतं सगळं''.

अक्षयची री ओढत लगेच अपूर्वा म्हणते,''तो पूर्णतः भावनाशून्य माणूस आहे, उद्धट आहे आणि तापट आहे, एकाही व्यक्तीसोबत तो खरा नाहीये. मी त्याला कुठे खरं मानलं असतं माहितीय , जर तो कायम अमृता देशमुखची साथ देत आला असता. पण तो तिच्याशी सुद्धा लॉयल नाहीये..''

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Richa Chadha: भारतीय सैन्याची खिल्ली उडवणारी रिचा पाकिस्तानची बाजू घेतानाही दिसली होती, पहा Viral Video

अपूर्वाच्या या म्हणण्यावर अमृता देशमुख म्हणाली,''नाहीच आहे आणि माझी तशी अपेक्षा पण नाहीये पहिल्या दिवसापासून... कारण त्याचा मला इतका त्रास झाला असता ना प्रत्येक नॉमिनेशनचा...'', अपूर्वा म्हणाली, ''मी एक थर्ड पर्सन म्हणून विचार करते आहे''. त्यावर अमृता देशमुख म्हणाली, ''मला पण असं वाटत, मी बोलून देखील दाखवलं आहे''.

आता प्रसाद विरोधातील ही चर्चा अजून किती रंगली, पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.