Bigg Boss Marathi 4:''अरेरावी करू नकोस, आली मोठी महाराणी..'' राखी आणि विशाल मध्ये राडा

बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्रीच्या माध्यमातून घरात प्रवेश केलेल्या विशाल निकम आणि राखी सावंत यांच्यातील भांडणाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Bigg Boss Marathi 4: Rakhi Sawant V/S Vishal Nikam arguments
Bigg Boss Marathi 4: Rakhi Sawant V/S Vishal Nikam argumentsGoogle

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात लवकरच घणाघाती युद्ध रंगलेलं पहायला मिळेल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. नुकत्याच घरात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री झालेल्या आहेत. ज्यात ड्रामा क्वीन राखी सावंत, बिग बॉस ३ चा विजेता विशाल निकम, बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या भागात तिखट मिरची म्हणून गाजलेली मीरा जगन्नाथ आणि तिसऱ्या सिझनमधला स्पष्टवक्ता सदस्य म्हणून गाजलेला आरोह वेलणकर यांचा समावेश आहे.

बाकीच्यांचे माहित नाही पण राखी सावंत हे नावच खळबळ करायला पुरेसं आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. आणि आता राखीनं आपल्या स्वभावाला जागून बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. तिनं आल्या आल्या पंगा घेतला तो तेजस्विनी लोणारीशी आणि आता राखीची जुंपली ती विशाल निकमशी. चला आजच्या भागाच काय घणाघात पहायला मिळणार त्याचा थोडा अंदाज घेऊया.(Bigg Boss Marathi 4: Rakhi Sawant V/S Vishal Nikam arguments)

आज घरात राखी VS विशाल बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली. अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, 'तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ? लाईट बंद झाले ना ?', त्यावर अमृता म्हणाली, 'झोपते आहे किट, त्यावर राखी म्हणाली, टमग झोप ...' आणि इथून वाद सुरु झाला. अमृता म्हणाली,' मला नाही झोपायचं इतक्यात'. त्यावर राखी तिला म्हणाली,' माझ्या डोक्यावर का नाचतेस ?', अमृता म्हणाली, 'मी इथे बसून नाचते आहे'. राखी म्हणाली, 'मी रात्री बसते तुझ्या डोक्यावर थांब... इडियट...माझी झोपच गेली. आता सगळे झोपल्यानंतर मी बोलणार... उगीच भांडणं ना?'

Bigg Boss Marathi 4: Rakhi Sawant V/S Vishal Nikam arguments
Bigg Boss Marathi 4: ''तर तुझा दुसरा हातही तुटेल ...'', घरात एन्ट्री करताच तेजस्विनीवर का भडकली राखी?

विशाल त्यावर म्हणाला,'आता झोपा ना तुम्ही'. राखी त्यावर म्हणाली,'आता नाही झोपणार माझी झोप गेली...बोलणार मी आता, माझी मर्जी'. विशाल म्हणाला, 'तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय ? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून'. त्यावर राखी पलटवार करत म्हणाली, 'मी तेच करते आहे जे ती करत होती'. विशाल म्हणाला, 'गप बसायचं..'. राखी म्हणाली, 'तू गप बस...', आता हा सगळा संवाद आहे विशाल आणि राखीमधला...खरी मजा तर प्रत्यक्ष भांडण पाहण्यात आहे...सध्या प्रोमो व्हायरल झालाय तो मात्र नक्की पहा.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये विशाल आणि राखी मध्ये कडाक्याचे भांडणं झाले आहे असे दिसून येते आहे. राखीनं फर्माइश सोडत म्हटलं, 'बिग बॉस माझी कॉफी पाठवा आता...', त्यावर विशाल म्हणाला, 'तुमच्या बोलण्याने disturb होत आहेत सर्व, झोपा...', मग राखीच ती... म्हणाली,'तू झोप मला सांगू नकोस ... ',मग मात्र पारा चढलेला विशाल म्हणाला, 'अरेरावी नका करू इथे ...', राखी म्हणाली, 'माझी मर्जी ... ',त्यावर विशालने देखील उत्तर दिले, 'मर्जी सगळीकडे नाही चालणार ...', बघूया हा वाद अजून किती वाढला ... आजच्या भागामध्ये. त्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन चौथा रात्री १० वा कलर्स मराठीवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com