Nora Fatehi: "घर घेण्यासाठी माझ्याकडून पैसे अन् गाडी..", सुकेशचे नोरावर गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrasekhar's Claim Nora Fatehi

Nora Fatehi: "घर घेण्यासाठी माझ्याकडून पैसे अन् गाडी..", सुकेशचे नोरावर गंभीर आरोप

Sukesh Chandrasekhar's Claim Nora Fatehi: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रीची नावे जोडली गेली आहेत. ईडीने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीही चौकशी केली आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे.

हेही वाचा: Ved Movie Box Office Collection: रितेशचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट! आता प्रतिक्षा सेंच्यूरीची

अलीकडेच नोरा फतेहीने सुकेशवर आरोप केला होता की, त्याने तिला आपली गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. त्या बदल्यात तो नोराला आलिशान जीवनशैली आणि मोठा बंगला देणार होता.

हेही वाचा: Pathaan Movie: पैशाला नाय तोटा 'पठाण'चा आनंद मोठा! अडीच हजारांना एक तिकिट, तरीही...

आता नोरा फतेहीच्या या वक्तव्यावर सुकेशने सांगितलं की, नोराने घर घेण्यासाठी पैसे मागितले होते. मोरोक्कोमध्ये घर घेण्यासाठी त्याने नोरा फतेहीला पैसेही दिले. त्याने जॅकलीन फर्नांडिसला सोडावं अशी तिची इच्छा होती. नोरा त्याला त्रास देत होती असंही सुकेशने सांगितलं. आता ती स्वतःला वाचवण्यासाठी काहीही सांगत असल्याचही त्याने सांगितलं.

हेही वाचा: Pathaan रिलीज होतोय अन् चर्चा Don 3 ची रंगलीय..शाहरुख उद्या म्हणे डबल धमाका करणार..जाणून घ्या

नोरा फतेहीला कार देण्याच्या प्रकरणावरही सुकेश म्हणाला की, नोरा भारताची नाही. यामुळे तिने ते वाहन तिच्या एका जवळच्या मैत्रींनीच्या पतीच्या नावावर नोंदणीकृत करण्यासाठी सांगितले. नोरा फतेहीला जॅकलीन फर्नांडिसचा हेवा वाटत होता, असा दावाही महाठग यांनी केला आहे.

हेही वाचा: Nora Fatehi : 'नोरा जॅकलीनवर जळायची!' मला म्हणायची, 'तू तिला...' सुकेशचा धक्कादायक खुलासा

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील युक्तिवाद स्थगित केला. कोर्टात वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट देण्याची जॅकलिनची याचिकाही कोर्टाने मान्य केली आहे. कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.