Masoom Sequel : तब्बल ४० वर्षांनी येणार 'मासूम' चा सिक्वेल!

शेखर कपूर हे त्यांच्या मासूम चित्रपटाचा सिक्वेल करण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. नव्या दमाच्या तरुण कलाकारांना घेऊन कपूर या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करणार आहेत.
Masoom Sequel Confirms Shekhar Kapoor Director
Masoom Sequel Confirms Shekhar Kapoor Director

Shekhar Kapur confirms directing 1983 blockbuster Masoom’s sequel : लकडी की काठी, काठी पें घोडा, घोडे रे दुम पे जो मारा हातोडा.....हे गाणं अनेकांना माहिती असेल. १९८३ मध्ये आलेल्या मासूम या चित्रपटातील हे गाणं आज इतक्या वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या या चित्रपटानं कित्येक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. आता या चित्रपटाबाबत एक वेगळी बातमी समोर आली आहे.

शेखर कपूर हे त्यांच्या मासूम चित्रपटाचा सिक्वेल करण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. नव्या दमाच्या तरुण कलाकारांना घेऊन कपूर या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करणार आहेत. पहिल्या भागामध्ये प्रसिद्ध कलाकार नसिरुद्दीन शहा आणि शबाना आझमी यांनी भूमिका केल्या होत्या. याबाबत इंडिया टूडेनं विशेष माहिती दिली आहे.

काही चित्रपट असे असतात की ज्यांच्यावर काळाच्या कोणत्याही बंधनाचा परिणाम होत नाही. मासूम हा शेखर कपूर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. त्यांच्या पहिल्याच चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

मासूमच्या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मासूम या चित्रपटाचा पुढचा भाग येणार याविषयी चर्चा रंगली होती. त्यावर आता मेकर्सकडून सांगण्यात आले आहे की, त्याचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपणच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्याबाबतचा अधिकचा तपशील हा नंतर आपल्यापुढे घेऊन येऊ असे कपूर यांनी सांगितले आहे.

Masoom Sequel Confirms Shekhar Kapoor Director
मीच माझ्या रुपाची राणी गं! कंगनाचा तोराचं न्यारा..Kangana Ranaut
Masoom Sequel Confirms Shekhar Kapoor Director
Masoom Sequel Confirms Shekhar Kapoor Director

शेखर कपूर यांच्याविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये एकापेक्षा एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये बँडिट क्विन, मिस्टर इंडिया, एलिझाबेथ अँड एलिझाबेथ - द गोल्डन एज या चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करावा लागेल.

Masoom Sequel Confirms Shekhar Kapoor Director
Kerala Tour: तुम्हाला ही केरळच्या निसर्ग सौंदर्यात हरवायचं आहे? मग या ठिकाणांना नक्की भेट द्याच ...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com