लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, VIDEO

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत लवकरच नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.
लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, VIDEO
esakal

झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीम गाठ' ही सिरीयल अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि यश म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नेहा आणि यश यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. आता लवकरच मालिकेत नवा ट्विट्स पाहायला मिळणार आहे. अनेक अडचणींना सामोरे जात दोघांचा साखरपुडा लवकरच पार पडणार आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमध्ये सर्वांचे लक्ष वेधले आहे ते म्हणजे परीने. ही मालिका या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. त्यामुळे प्रेक्षक नेहमीच मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात.

लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, VIDEO
माझी तुझी रेशीमगाठ: नेहासमोर येणार यशची खरी ओळख?

येत्या भागात यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे नवे प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमामध्ये नेहाने सुंदर हिरवी गार साडी परिधान केली आहे. केसांत गजरा माळला आहे. शिवाय सुंदर अशी ऑक्सइड ज्वेलरी घातली आहे. नेहाचा हा लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तर यशने नेहाच्या लुका मॅच होईल अशी ड्रेफरी केली आहे. या पारंपारिक लूकमध्ये दोघे खुप सुंदर दिसत आहेत.

तसेच प्रार्थनाने आपल्या इंस्टा अकाऊंटवर या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नेहा लवकरच एंगेज होणार अशी माहिती दिली आहे.

लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, VIDEO
माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

या मालिकेत सध्या यश-नेहाच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु आहे. मालिकेत नेहा आणि यशला आल्या प्रेमासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे एक मुलगी असणारी सर्वसामान्य घरातील नेहा आणि दुसरीकडे एक उद्योगपती आई-वडील गमावलेला आजोबांनी, काका-काकींनी सांभाळ केलेला यश. या दोघांना आपले कुटुंब आणि त्यांच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जाव लागत आहे. परंतु मालिकेत लवकरच नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com