ललित, सई अन् ...Medium Spicy चित्रपटाचा ट्रेलर लाँच, VIDEO | medium spicy trailer launch dro95 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ललित, सई अन् ...Medium Spicy चित्रपटाचा ट्रेलर लाँच, VIDEO
ललित, सई अन् ...Medium Spicy चित्रपटाचा ट्रेलर लाँच, VIDEO

ललित, सई अन् ...Medium Spicy चित्रपटाचा ट्रेलर लाँच, VIDEO

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित "मीडियम स्पाइसी" लवकरच भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय ललित प्रभाकर शेफच्या वेशात दिसत आहे.

ललितने स्वतःच्या इंस्टा अकाऊंटला मीडियम स्पाइसी चीत्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि पर्ण पेठे (Parna Pethe ) सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्या प्रेमाचा ट्रँगल ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा: 'कधीतरी आमच्या आयुष्यात पण डोकवा' लोककलावंतासाठी अमृताने जोडले हात..

शेफ निस्सीम म्हणजेच ललित प्रभाकर हॉटेलमध्ये काम करतो आहे आणि त्याचा सहकारी मित्र शेफ शुभंकर म्हणजे सागर देशमुखच्या "ए शेफ, यार काम काम होता है, लाईफ नहीं" अशा संवादापासून सुरु होणारा हा ट्रेलर सुरुवातीलाच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.

आई, वडील, बहीण, मित्र, मैत्रिणी, सहकारी अशा नात्यांची चॉईस जास्त असल्याने कॉम्प्लिकेटेड आयुष्य जगताना काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीत वावरणाऱ्या एका शेफच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. असे या ट्रेलरमधून पाहायला मिळतं.

हेही वाचा: निवेदिता आणि अशोक सराफ यांचा रोमँटिक Video व्हायरल

साऊथ इंडियन टोन मध्ये बोलणारी शेफ गौरी या दाक्षिणात्य मुलीची भूमिका सई ताम्हणकर हिने साकारली आहे. तर आपल्या ठाम मतांसह स्वतःच्या पायावर उभी असलेली प्राजक्ता ही भूमिका पर्ण पेठे हिने साकारली आहे तसेच नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांना ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी या कलाकारांनीदेखील या चित्रपटामध्ये विशेष भूमिका साकारली आहे.

मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड भाषिक रंगभूमीवरील प्रसिद्ध आणि आघाडीचे नाव आणि एक उत्तम संकलक म्हणून प्रसिद्ध असलेले युवा नाटककार मोहित टाकळकर "मीडियम स्पाइसी" या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

Web Title: Medium Spicy Trailer Launch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top