Merry Christmas IMDb Rating : कतरिना अन् विजयच्या 'मेरी ख्रिसमला' IMDb कडून 8.8 चे रेटिंग! श्रीराम राघवनची जोरदार कामगिरी

कतरिना कैफ आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपति यांचा मेरी ख्रिसमस हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.
Merry Christmas Imdb Rating
Merry Christmas Imdb Rating esakal

Merry Christmas Imdb Rating : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपति (Vijay Setupathy ) यांचा मेरी ख्रिसमस हा गेल्या काही दिवसांपासून (Latest News Of Merry Christmas) चर्चेत आला आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात आणखी एक गुड न्युज समोर आली आहे. Merry Christmas Imdb News

बदलापूर, अंधाधून (Andhadhun) सारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या (Badlapur) दिग्दर्शकांमध्ये श्रीराम राघवन (Director Shriram Raghwan) यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या अंधाधून नावाच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. अशातच आता प्रदर्शित झालेल्या मेरी ख्रिसमस (Merry Christmas Movie) नावाच्या चित्रपटाचं चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

विजय सेतुपति, कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिक असलेल्या मेरी ख्रिसमसनं थिएटरमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. अशातच या चित्रपटानं IMDb 8.8 वर असं रेटिंग दिलं आहे. त्यामुळे मेरी ख्रिसमसच्या टीमच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांच्या अलीकडील दिग्दर्शनातील उत्कृष्ट कलाकृती म्हणजे "मेरी ख्रिसमस" ! या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलीच कमाई तर केली आणि एका नवा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमॅटिक (Merry Christmas Box Office Collection) चित्रपटाने 8.8 IMDb रेटिंग मिळवले आहे. "अंधाधुन" आणि "बदलापूर" सारख्या दर्जेदार चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या राघवन यांच्या कामाची जादू "मेरी ख्रिसमस" मध्ये बघायला मिळाली.

"मेरी ख्रिसमस" मधील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची दमदार केमिस्ट्री पडद्यावर वेगळीच जादू निर्माण करून जाते. या चित्रपटाने त्याच्या आकर्षक कथन आणि उत्कृष्ट अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.

12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झालेला "मेरी ख्रिसमस" मध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असून दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा खास चित्रपट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com